Type Here to Get Search Results !

Gramin Uday Logo

Gramin Uday Logo

जिल्ह्यात रविवारी शिष्यवृत्ती परीक्षा संपन्न



29 हजार विद्या
र्थ्यानी  दिली परीक्षा, प्रशासकीय यंत्रणा सज्ज

अमरावती, दि. २३ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क ): जिल्हा परिषद अमरावतीच्या शिक्षण विभागामार्फत (प्राथमिक) पूर्व उच्च प्राथमिक (इयत्ता 5 वी) व पूर्व माध्यमिक (इयत्ता 8 वी) शिष्यवृत्ती परीक्षेचे आयोजन रविवार, दि. 22 फेब्रुवारी 2026 रोजी करण्यात आले होते. या परीक्षेसाठी जिल्ह्यात एकूण 225 परीक्षा केंद्रे निश्चित करण्यात आली असून, सुमारे 29 हजार विद्यार्थ्यानी हि परीक्षा दिली आहे.

या परीक्षेच्या नियोजनाबाबत अधिक माहिती देताना शिक्षण विभागाने कळविले आहे की, इयत्ता 5 वी साठी जिल्ह्यात 134 केंद्रे निर्धारित करण्यात आली असून तेथे 18,447 परीक्षार्थी परीक्षा दिली. तसेच, इयत्ता 8 वी साठी 91 परीक्षा केंद्रे असून तेथे 10,551 परीक्षार्थ्यानी  आपली क्षमता सिद्ध केली आहे. संपूर्ण जिल्ह्यात एकूण 225 केंद्रांवर ही परीक्षा पार पडली .

परीक्षेच्या पारदर्शक आणि सुरळीत संचालनासाठी कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली होती . प्रत्येक केंद्रावर एक केंद्र संचालक एकूण 225 आणि 1 हजार 439 पर्यवेक्षकांची नेमणूक करण्यात आली होती. गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी जिल्हा स्तरावर 2 भरारी पथके आणि प्रत्येक तालुक्यासाठी स्वतंत्र एक पथक कार्यान्वित करण्यात आले होते.


Post a Comment

0 Comments