पोलिस अधीक्षक, अमरावती ग्रामीण विशाल आनंद
अमरावती, दि. ०३ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क): जिल्ह्यात आगामी काळात सण, उत्सव साजरा होणार आहेत. या पार्श्वभूमीवर ग्रामीण पोलीस अधिनियमांतर्गत शहरात कलम 38 लागू झाले आहे.
आगामी काळात विविध धर्मियांचे सण उत्सव मोठ्या उत्साहाने साजरे केले जातील. या कालावधीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियमाच्या कलम 38 नुसार सर्व ग्रामीण जिल्ह्यामध्ये परिसरातील व त्यांच्यावरील अधिकाऱ्यांना (पोलीस आयुक्तलांचे क्षेत्र वगळून) कालपासून, दि. 2 फेब्रवारी ते 31 डिसेंबर 2026 च्या मध्यरात्रीपर्यंत अधिकार प्रदान करण्याचे आदेश पोलिस अधीक्षक, अमरावती ग्रामीण विशाल आनंद यांनी दिले आहे.
रस्त्यावरून जाणारी मिरवणूक सुरळीत ठेवणे, उपासनास्थळी गर्दी होणार असेल किंवा अडथळ्याचा संभव असेल तर अडथळा होऊ न देणे, सर्व मिरवणूकाच्या व जमावाच्या प्रसंगी व पूजा-अर्चा या ठिकाणी कोणताही रस्ता किंवा अडथळा संभव असेल अशा सर्व बाबतीत अडथळा न होवू देण्यासाठी याठिकाणी बंदोबस्त ठेवणे, सर्व रस्त्यांवर किंवा रस्त्यात, इतर सर्व सार्वजनिक किंवा लोकांच्या येण्याच्या जागेमध्ये बंदोबस्त राहण्यासाठी, वाद्यांबाबत नियम व नियंत्रण ठेवणे, सार्वजनिक जागेत ध्वनिक्षेपकाच्या वापराबाबत नियम व नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. यासाठी हे आदेश देण्यात आले आहेत.
Post a Comment
0 Comments