आज बुधवारी तालुकास्तरीय जनसंवाद व तक्रार निवारण कार्यक्रम - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Wednesday, February 18, 2026

आज बुधवारी तालुकास्तरीय जनसंवाद व तक्रार निवारण कार्यक्रम



नागरिकांच्या समस्या गावातच ऐकल्या जाणार

अमरावती, दि. १८ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क) : पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पुढाकाराने 'मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान' प्रभावीपणे राबवण्यात येत आहे. तसेच नागरिकांच्या समस्या निवारणासाठी बुधवार, दि. 18 फेब्रुवारी रोजी जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये 'तालुकास्तरीय जनसंवाद व तक्रार निवारण' कार्यक्रम होणार आहे. यात नागरिकांच्या समस्या गावातच ऐकून घेतल्या जाणार आहे.

या कार्यक्रमात नागरिकांच्या वैयक्तिक आणि सार्वजनिक तक्रारी, विविध विकास कामांची सद्यस्थिती, प्रलंबित प्रस्ताव आणि स्थानिक पातळीवरील महत्त्वाच्या प्रश्नांचा सविस्तर आढावा घेतला जाणार आहे. या दिवशी तहसील, जिल्हा परिषद, तसेच संबंधित तालुक्यातील सर्व विभागांचे अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी, ग्रामसचिव आणि कृषी सहाय्यक उपस्थित राहणार आहेत.

प्रशासनाने तालुकास्तरीय जनसंवाद व तक्रार निवारण कार्यक्रमासाठी समन्वयक अधिकारी तालुकानिहाय जबाबदारी सोपवली आहे. त्यांच्या उपस्थितीत तालुकास्तरीय जनसंवाद व तक्रार निवारण कार्यक्रम घेण्यात येणार आहे. त्यासोबतच जिल्हा परिषद, तसेच संबंधित तालुक्यातील इतर सर्व विभागाचे अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी, ग्रामसचिव, कृषी सहायक यांच्या उपस्थितीत तालुक्यातील जनसंवाद व तक्रार निवारण कार्यक्रम पार पाडावा, असे निर्देश जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी दिले आहे.


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages