Type Here to Get Search Results !

Gramin Uday Logo

Gramin Uday Logo

जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयामार्फत तालुकास्तरावरील जनता दरबाराचे वेळापत्रक जाहीर

 


अमरावती, दि. ०३ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क): 
अमरावती जिल्ह्यातील भूमी अभिलेख विभागाच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी आणि प्रशासकीय कामात सुसूत्रता आणण्यासाठी जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख हे जिल्ह्यातील विविध तालुक्यांचा दौरा करणार आहेत. या दौऱ्यादरम्यान  नागरिकांची जमीन मोजणी, नगर भूमापन, एकत्रिकरण याबाबत समस्या सोडविणार आहेत. तसेच या  कार्यालयाचे अधिनस्त असलेल्या कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना संबंधित दिवशी उपस्थित राहतील.

या जाहीर वेळापत्रकानुसार, 5 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 10 ते 1:30 या वेळेत चांदुर रेल्वे आणि दुपारी 3 ते 6 या वेळेत तिवसा उपअधीक्षक कार्यालयात ते भेट देतील. 6 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता नांदगांव खंडेश्वर आणि दुपारी 3 वाजता धामणगांव रेल्वे येथे दौरा नियोजित आहे. 9 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 ते 2 या वेळेत अमरावती मुख्यालय आणि दुपारी 3 ते 6 दरम्यान भातकुली उपअधीक्षक कार्यालयात आढावा घेतला जाईल.

दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात, 12 फेब्रुवारी रोजी सकाळी मोर्शी आणि दुपारी वरूड येथे, तर 13 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता चांदुर बाजार आणि दुपारी  3 वाजता अचलपूर येथे जिल्हा अधीक्षक उपस्थित राहतील. 16 फेब्रुवारी रोजी दर्यापूर सकाळी 10 वाजता आणि अंजनगांव येथे दुपारी 3 वाजता नागरिेांच्या तक्रारींचे निवारण करण्यात येईल. दौऱ्याचा समारोप 20 फेब्रुवारी रोजी दुपारी 12 ते 3 या वेळेत चिखलदरा आणि 23 फेब्रुवारी रोजी दुपारी 12 ते 3 या वेळेत धारणी उपअधीक्षक कार्यालयातील भेटीने होईल. जनतेच्या तक्रारींचे तात्काळ निवारण करण्यासाठी दक्षता घेण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख महेंद्रकुमार शिंदे यांनी केले आहे.


Post a Comment

0 Comments