पिंप्री - पूर्णा - तिरी रंगणार भव्य संगीतमय शिवमहापुराण कथा व अखंड हरिनाम सप्ताह. - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Monday, February 23, 2026

पिंप्री - पूर्णा - तिरी रंगणार भव्य संगीतमय शिवमहापुराण कथा व अखंड हरिनाम सप्ताह.

 पूर्णा तीरी शिवकथा पवित्र ।
ऐका पुराणाची प्राचीन साक्ष ॥



दि.५ ते १२ मार्च दरम्यान भव्य आयोजन

चांदूरबाजार दिनांक २३ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क)

        अमरावती जिल्ह्यातील चांदूरबाजार तालुक्यात व पूर्णा नदीच्या पावन तीरावर वसलेल्या पिंपरी पूर्णा या ऐतिहासिक व धार्मिक परंपरेने समृद्ध गावात दिनांक ५ मार्च ते १२ मार्च २०२६ या कालावधीत भव्य संगीतमय शिवमहापुराण कथा समस्त ग्रामवासी व विठ्ठल रुख्मिणी मंदिर पिंप्री पूर्णा द्वारा आयोजित करण्यात आली आहे.

पूर्णा (पयोष्णी) नदीच्या प्राचीन प्रवाहाशी, शिवपरंपरेशी आणि स्थानिक पुराण-इतिहासाशी निगडित  कथा राहणार आहे. या कथामालेत शिवमहापुराण, रामायण, महाभारत तसेच विविध पुराणग्रंथांच्या आधारे या प्रदेशाचा पौराणिक व ऐतिहासिक वारसा उलगडण्यात येणार आहे

पूर्णा नदीचा परिसर प्राचीन काळापासून शिवोपासना, तीर्थपरंपरा व शिवालयांनी समृद्ध असल्याने हा भाग शिवभूमी म्हणून ओळखला जातो. प्रस्तुत कथेमध्ये पूर्णा नदीच्या पात्राचे प्राचीनत्व, ऋषीपरंपरा, पुराणकालीन घटना, तसेच परिसरातील प्राचीन ते अर्वाचीन धार्मिक इतिहासाचा सखोल अभ्यास श्रोत्यांसमोर मांडला जाणार आहे.

या शिवमहापुराण कथेचे प्रवचन सुप्रसिद्ध वक्ते, संशोधक, शिक्षक व आध्यात्मिक अभ्यासक ह.भ.प. प्रा. श्री श्रीकांत महाराज भुसकडे (हिरुरकर) हे करणार आहेत.

श्री भुसकडे महाराज हे इतिहास, पुराणपरंपरा, संतसाहित्य व भारतीय आध्यात्मिक संस्कृतीचे अभ्यासक म्हणून परिचित असून त्यांनी विशेषतः विदर्भातील पयोष्णी (पूर्णा) नदी परिसराचा पुराणाधिष्ठित इतिहास, संतपरंपरा व स्थानिक धार्मिक स्थळांचा अभ्यास केला आहे.

प्रभावी व ओघवत्या शैलीतील कथन, संशोधनाधिष्ठित मांडणी आणि अध्यात्म व इतिहास यांचा संगम घडविणारी प्रवचनशैली ही त्यांची विशेष ओळख आहे. कीर्तन, प्रवचन, आध्यात्मिक व्याख्याने व सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे समाजप्रबोधनाचे कार्य ते सातत्याने करीत आहेत.

त्यांच्या कथेमध्ये ग्रंथाधारित संदर्भ, संतवाङ्मय, पुराणातील प्रसंग आणि स्थानिक इतिहास यांचा सुसंगत संगम अनुभवायला मिळेल.

जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज बीजोत्सवानिमित्त आयोजित या संगीतमय शिवमहापुराण कथा तथा अखंड हरिनाम सप्ताहा अंतर्गत दररोज विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न होणार आहेत.

दैनंदिन कार्यक्रम पुढीलप्रमाणे राहतील —

पहाटे — काकडा आरती

सकाळी — गाथा भजन

दुपारी — शिवमहापुराण कथा 

सायंकाळी — हरिपाठ

रात्री — महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकारांचे हरिकीर्तन

सदर दिव्य धार्मिक सोहळ्यास भाविक भक्तांनी बहुसंख्येने उपस्थित राहून आध्यात्मिक लाभ घ्यावा तसेच तन-मन-धनाने या कार्यक्रमास सहकार्य करावे, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages