अंजनगाव सुर्जी शहरवासीयांची घरपट्टी कर व्याजासह त्वरित माफीची जोरदार मागणी - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Sunday, January 18, 2026

अंजनगाव सुर्जी शहरवासीयांची घरपट्टी कर व्याजासह त्वरित माफीची जोरदार मागणी

 


दि.१९ अंजनगाव सुर्जी:
अंजनगाव सुर्जी शहरातील नागरिकांनी प्रशासनाकडे घरपट्टी कर सरसकट व्याज आणि दंड यासह त्वरित माफ करण्याची मागणी लावून धरली आहे. वाढती महागाई, बेरोजगारी, शेतीमालाला मिळणारा कमी दर आणि मजुरीतील अस्थिरता यामुळे सामान्य नागरिक आधीच आर्थिक संकटात आहेत. अशा परिस्थितीत घरपट्टी करावर आकारण्यात येणारे अव्वाच्या सव्वा दंड व व्याज अन्यायकारक व जुलमी असल्याची तीव्र भावना शहरात व्यक्त होत आहे  
आर्थिक संकट: गोरगरीब, मजूर, शेतकरी, शेतमजूर आणि मध्यमवर्गीय कुटुंबे यांच्यासाठी घरपट्टी कर भरणे दिवसेंदिवस अशक्य होत चालले आहे 
अवाढव्य दंड: अनेक वर्षांची थकबाकी आणि त्यावर वाढत जाणारे व्याज व दंड यामुळे मूळ कराच्या रकमेपेक्षा दुप्पट-तिप्पट रक्कम भरण्याची वेळ नागरिकांवर आली आहे 
कोविडचा परिणाम: कोविडनंतर अनेकांचे व्यवसाय बंद पडले, मजुरी कमी झाली, तर शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीचा फटका बसला. अशा परिस्थितीत व्याज व दंड माफ न करता वसुलीचा तगादा लावणे म्हणजे सामान्यांवर अन्याय आहे, असे नागरिकांचे म्हणणे आहे 
शहरातील सामाजिक संघटना, नागरिक गट आणि विविध घटकांनी या प्रश्नावर एकत्र येण्यास सुरुवात केली आहे. नगरपरिषद प्रशासनाला लवकरच निवेदन देण्यात येणार आहे. प्रशासनाने तातडीने सकारात्मक निर्णय न घेतल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्याचा इशाराही नागरिकांकडून देण्यात येत आहे 
हा कर न्याय्य, मानवतावादी आणि सामान्यांच्या आर्थिक क्षमतेनुसार असावा, अशी भावना व्यक्त होत आहे 

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages