अॅबेकस स्पर्धेत शिरजगाव कसबा येथील विद्यार्थ्यांची राष्ट्रीय स्तरावर भरारी - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Sunday, January 18, 2026

अॅबेकस स्पर्धेत शिरजगाव कसबा येथील विद्यार्थ्यांची राष्ट्रीय स्तरावर भरारी


दि.१९ शिरजगाव कसबा:
येथील गुरुकुंज क्लासेसच्या ४८ विद्यार्थी व विद्यार्थिनींनी राष्ट्रीय स्तरावरील अॅबेकस स्पर्धेत घवघवीत यश मिळवत यशाचे शिखर गाठले आहे. नागपूर येथील श्रीमती राधिकाबाई पांडव कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये आयोजित या स्पर्धेत क्लासेसच्या संचालिका रक्षा जाजू यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता.
सहभागी विद्यार्थी: या क्लासमध्ये गावातील व परिसरातील तसेच बालमुकुंद राठी विद्यालय, परशुराम पब्लिक स्कुल, जि.प. मराठी शाळा व संस्कार स्कुल येथील विद्यार्थी मोठ्या प्रमाणात शिकवणीकरिता येतात.
यशाचे श्रेय: संचालिका रक्षा जाजू यांनी व्यक्त केले की, क्लासेसमधील दर्जेदार शिक्षण व शिस्त यामुळे विद्यार्थी सतत नवनवीन उपक्रमांमध्ये सहभागी होत असतात व प्रावीण्य प्राप्त करतात.
पुरस्कार वितरण: सहभागी विद्यार्थ्यांना छत्रपती संभाजीनगर येथील जी चॅम्प ग्रुपकडून ट्रॉफी, मेडल, प्रमाणपत्रासह पारितोषिक प्रदान करण्यात आले.
अभिनंदन: यशस्वी विद्यार्थी आणि संचालिका रक्षा जाजू यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

 

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages