Type Here to Get Search Results !

Gramin Uday Logo

Gramin Uday Logo

प्रसिद्ध बहिरम यात्रेत आमदार प्रवीण तायडे यांच्या पुढाकाराने भव्य 'हिंद केसरी' शंकरपट स्पर्धा



 राज्यातून शेतकरी आपल्या बैलजोड्या घेऊन बहिरमच्या जंगी शंकरपटासाठी दाखल

दि.१९ अचलपूर/(ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क)
अचलपूर मतदार संघाचे नवनिर्वाचित आमदार प्रवीण तायडे यांनी बहिरम येथे सलग दुसऱ्या वर्षी ही आयोजित आमदार हिंदकेसरी जंगी शंकरपटाच्या मैदानात पहिल्या दिवशी १८ जानेवारी रोजी शेतकरी, प्रेक्षकांची मोठी गर्दी होती. पहिल्या दिवशी लकी बादशाह चर्चेत राहिले आहे.
अचलपूर मतदार संघाचे आमदार प्रवीण तायडे यांच्या पुढाकाराने सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या चांदुरबाजार तालुक्यातील श्री क्षेत्र बहिरम बाबा  यात्रा महोत्सवात विदर्भातील सर्वप्रथम हिंद केसरी मैदानावर आमदार हिंद केसरी जंगी शंकर पटाचे तीन दिवसीय आयोजन करण्यात आले आहे. अचलपूरचे आमदार प्रवीण तायडे यांच्या नेतृत्वात आयोजित या जंगी शंकरपटाचा शुभारंभ काल १८ जानेवारी रोजी करण्यात आला.
यावेळी भाजपा पक्षाचे नेते प्रमोद कोरडेअशोक बनसोडअचलपूर नगर परिषद नगराध्यक्ष रुपाली अभय माथनेअंजनगाव सूर्जीचे नगराध्यक्ष अविनाश गायगोलेगजानन कोल्हेभाजपा पक्षाचे सरचिटणीस सुधीर रसेनयना जोशीअभय माथनेरुपेश ढेपे, तालुकाध्यक्ष शंकर मालखेडेरितेश नवलेसंजू बेलकर, डॉ. घुलतेनिलेश उभाडछोटू लाडोळेविशाल काकडसुखदेव पवारमनोहर सुनेविलास तायवाडेसुरेंद्र तांबेअभिजीत तायडेचिंटू बहोरियाप्रफुल बर्वे आदी भाजपा पक्षाचे पदाधिकारी, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या जंगी शंकर पटात जवळपास २५० मालकांनी आपल्या बैलजोड्या या स्पर्धेत सहभागी करण्याकरीता दाखल झाले, तीन गटात आयोजित या पटातील विजेत्यांना ११ लाखाचे बक्षीसे वितरीत केल्या जाणार आहे.
लकीबादशाहबादलडॉलर यांचा सहभाग या पटात महत्वपूर्ण मानल्या जात आहे. यावेळी घड्याळ वाले गणेशभाऊ पळशिकरचरण खरासे सुद्धा दाखल झाले आहे.
सर्व शंकर पटातील स्पर्धकांसाठी विशेष व्यवस्था भाजपा पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आली आहे. या जंगी शंकरपटाचा समारोप २० जानेवारी रोजी बक्षीस वितरणाने केल्या जाणार आहे.

Post a Comment

0 Comments