अमरावती, दि. १७ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क): विधानपरिषदचे सभापती राम शिंदे यांचा रविवार दि. 18 जानेवारी रोजी जिल्ह्याच्या दौरा आहे.
दौऱ्यानुसार श्री. शिंदे रविवार, 18 जानेवारी रोजी सकाळी 8 वाजता नागपूर येथून वाहनाने अमरावतीकडे प्रयाण. सकाळी 10.30 वाजता शासकीय विश्रामगृह,अमरावती येथे आगमन व राखीव. सकाळी 10.45 वाजता शासकीय विश्रामगृह, येथून वाहनाने संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन, मोर्शी रोड, अमरावतीकडे प्रयाण करतील. सकाळी 11 वाजता संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन, मोर्शी रोड, येथे आगमन व राज्यस्तरीय धनगर समाज उपवधू-वर परिचय मेळावा कार्यक्रमास उपस्थिती. त्यानंतर दुपारी 1 वाजता अमरावती येथून वाहनाने नागपूरकडे प्रयाण करतील.
Post a Comment
0 Comments