जिल्ह्यात ७ फेब्रुवारीला 'नवोदय'ची प्रवेश परीक्षा; 3 केंद्रांवर होणार आयोजन - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Friday, January 16, 2026

जिल्ह्यात ७ फेब्रुवारीला 'नवोदय'ची प्रवेश परीक्षा; 3 केंद्रांवर होणार आयोजन



अमरावती, दि. १७ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क): जवाहर नवोदय विद्यालयातील इयत्ता 9 वी आणि 11 वीच्या (लेटरल एन्ट्री) रिक्त जागांसाठीची निवड चाचणी परीक्षा शनिवार, 7 फेब्रुवारी 2026 रोजी आयोजित करण्यात आली आहे. अमरावती जिल्ह्यातील एकूण 3 परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा पार पडणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

जवाहर नवोदय विद्यालयातील दर्जेदार शिक्षणाची संधी ग्रामीण आणि शहरी भागातील सर्व पात्र विद्यार्थ्यांना मिळावी, या उद्देशाने ही प्रवेश प्रक्रिया राबविली जात आहे. या परीक्षेसाठी पात्र असलेल्या विद्यार्थ्यांनी वेळेपूर्वी आपली तयारी पूर्ण करावी. परीक्षेच्या नियोजनासाठी निश्चित करण्यात आलेल्या 3 केंद्रांवर आवश्यक सर्व सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असून, विद्यार्थ्यांनी आपल्या प्रवेशपत्रावर दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे. या परीक्षेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील गुणवंत विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावरील शैक्षणिक प्रवाहात येण्याची मोठी संधी मिळणार आहे.


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages