दि.१० ब्राम्हणवाडा थडी:- येथील अत्यंत प्राचीन असलेल्या श्रीगंगामाई माता देवस्थान संस्थान यांच्या वतीने पौष यात्रा महोत्सवाला प्रारंभ झाला आहे. या निमित्ताने १२ जानेवारीपर्यंत गणेश महिमा कथेचे आयोजन करण्यात आले आहे.
कथावाचक: मधुरम सेवा प्रतिष्ठान, नागपूरचे अध्यक्ष श्यामनारायणदास महाराज हे आपल्या सुमधुर वाणीतून कथा प्रवचन करीत आहेत.
धार्मिक अनुष्ठाने: महाराज यांच्या सानिध्यात विविध धार्मिक अनुष्ठानांचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमानुसार दररोज सकाळी काकडा पूजन, नित्य पूजा विधी, श्री गणेश महिमा कथा, आरती, प्रसाद, गुरुदेव प्रार्थना, हरिपाठ, कीर्तन संध्या व भजन संध्याचे आयोजन होत आहे.
शोभायात्रा: १२ जानेवारीला प्रभातफेरी आणि भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे. या शोभायात्रेत विविध पालख्या, दिंड्या, भजन मंडळे, गणेशोत्सव व दुर्गा उत्सव मंडळे, तसेच लेझीम पथक आणि विठ्ठल बँड पार्टी सहभागी होणार आहेत.
महाप्रसाद: १३ जानेवारीला कीर्तन व महाप्रसादाचे आयोजन केले आहे.
या यात्रेमुळे ब्राम्हणवाडा थडी आणि परिसरात सध्या भक्तीमय वातावरण निर्माण झाले असून, भाविकांची मोठी गर्दी दिसून येत आहे.
Post a Comment
0 Comments