चांदूरबाजार (दि. १० जानेवारी २०२६):
श्री क्षेत्र बहिरम येथे सुरू असलेल्या नामसंकीर्तन सप्ताहाच्या पहिल्या दिवशी ह.भ.प. वेदांताचार्य पुरुषोत्तम महाराज बावस्कर यांनी कीर्तन सेवा केली. यावेळी त्यांनी "परमार्थ हा सवडीचा नाही तर आवडीचा विषय असावा" असे प्रतिपादन केले.
त्यांनी संत चांगदेव महाराज यांच्या गाथ्यातील कूट (रुपक) अभंगाचे विस्तृत विवेचन केले.
कीर्तनामध्ये विनोद करणे हे कुकर्म आहे, यावर त्यांनी कटाक्ष टाकला.
सिद्धांत हा दृष्टांताचा गाभा असावा, यावर त्यांनी भाष्य केले.
हा सप्ताह बहिरम बाबा संस्थानच्या वतीने दरवर्षी आयोजित केला जातो.
यावर्षीच्या सप्ताहाचे मार्गदर्शन ह.भ.प. संजय महाराज अलोणे (आळंदी) करत आहेत
या कीर्तन सेवेकरिता आदरणीय ऍड. तरुणजी शेंडे साहेब यांचे विशेष सहकार्य लाभले, त्याबद्दल समितीच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले.
या सप्ताहाला पंचक्रोशीतील भाविक भक्तांची मोठी उपस्थिती होती.
७ जानेवारी रोजी ह.भ.प. विठ्ठल महाराज वासकर (निवृत्त न्यायाधीश, वासकर फड पंढरपूर) यांची कीर्तन सेवा सायं. ६.३० ते ८.३० पर्यंत झाली, अशी माहिती सप्ताहचे प्रसिद्धी प्रमुख श्री गायकी सर यांनी दिली.
Post a Comment
0 Comments