Type Here to Get Search Results !

Gramin Uday Logo

Gramin Uday Logo

११ लाखांची 'जंगी लूट': बहिरम बाबा यात्रेत विदर्भ-महाराष्ट्रातील नामवंत बैलगाडा चालकांची झुंज


आमदार प्रवीण तायडे यांच्या मार्गदर्शनात शंकरपट स्पर्धा; राणा दाम्पत्य, पोटे यांच्या उपस्थितीत उद्घाटन
दि.१७ चांदूर बाजार:
तालुक्यातील श्रीक्षेत्र बहिरम बाबा येथे सातपुडा श्रीक्षेत्र बहिरम बाबा यात्रा महोत्सव २०२६ अंतर्गत विदर्भातील सर्वप्रथम अशी भव्य आमदार हिंद केसरी जंगी शंकरपट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा दिनांक १८, १९ व २० जानेवारी २०२६ दरम्यान बहिरम बाबा यात्रा महोत्सवाच्या मैदानावर पार पडणार आहे.
भव्य बक्षिसे: या जंगी शंकरपट स्पर्धेसाठी एकूण ११ लाख रुपयांची भव्य बक्षिसे (जंगी लूट) ठेवण्यात आली आहेत.
सहभागी चालक: विदर्भासह महाराष्ट्रातील नामवंत बैलगाडा चालक या स्पर्धेत सहभागी होणार आहेत.
गटवारी: स्पर्धेत जनरल गट, क गट व गाव गट असे स्वतंत्र गट ठेवण्यात आले असून प्रत्येक गटासाठी आकर्षक बक्षिसांची घोषणा करण्यात आली आहे. तसेच धुरकरी सन्मानासाठीही स्वतंत्र बक्षिसे जाहीर करण्यात आली आहेत.
आयोजन आणि उपस्थिती:
स्पर्धेचे आयोजन आमदार डॉ. प्रवीण तायडे (आमदार, अचलपूर विधानसभा) यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे.
उद्घाटन खा. डॉ. अनिल बोंडे व सौ. नवनीतताई राणा (खासदार, अमरावती) यांच्या उपस्थितीत होणार आहे.
अध्यक्षस्थानी प्रवीणजी पोटे (माजी मंत्री व पालकमंत्री) असतील.
यावेळी आ. रवि राणा, आ. प्रताप अडसड, आ. राजेश वानखडे, अचलपूर नगराध्यक्षा रूपाली माथने यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
सुरक्षितता, शिस्त व नियमानुसार स्पर्धा पार पाडण्यासाठी आयोजकांकडून विशेष नियोजन करण्यात आले आहे. या भव्य जंगी शंकरपट स्पर्धेत मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
या स्पर्धेतील विजेत्यांना बुलेट, युनिकॉन, डिलक्स दुचाकी आणि धुरकरी सन्मान असे लाखो रुपयांचे पुरस्कार देण्यात येणार आहेत.

Post a Comment

0 Comments