अण्णासाहेब पाटील महामंडळाकडून कर्ज प्रक्रियेबाबत खुलासा - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Monday, December 22, 2025

अण्णासाहेब पाटील महामंडळाकडून कर्ज प्रक्रियेबाबत खुलासा


अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन

अमरावती, दि. २३ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क): अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या कार्यवाहीबद्दल समाजमाध्यमांवरून चुकीची व दिशाभूल करणारी माहिती पसरवली जात असल्याचे समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर, महामंडळाने अधिकृत खुलासा प्रसिद्ध करून वस्तुस्थिती स्पष्ट केली असून मराठा समाजातील तरुण आणि नागरिकांना कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे.

या आचारसंहितेच्या अंमलबजावणीसाठी केवळ निवडणुका प्रलंबित असलेल्या हद्दीमध्येच नवीन पात्रता प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात आली आहे. मात्र, या क्षेत्रांव्यतिरिक्त उर्वरित संपूर्ण राज्यामध्ये पात्रता प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया नियमितपणे सुरू आहे. आचारसंहितेचा कालावधी संपल्यानंतर संबंधित क्षेत्रांमधील ही प्रक्रिया पुन्हा नियमानुसार पूर्ववत सुरू करण्यात येईल.

महामंडळाने पुढे स्पष्ट केले की, महामंडळाविषयी प्रसारित होत असलेल्या मराठा समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असून समाजमाध्यमांवरील दिशाभूल करणाऱ्या माहितीमुळे संभ्रम निर्माण होऊ नये, असे प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगण्यात आले आहे.


 

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages