पात्र उमेदवारांनी लाभ घेण्याचे आवाहन
अमरावती, दि. २३ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क): आंतरराष्ट्रीय स्तरावर नोकरीच्या शोधात असलेल्या सुशिक्षित तरुणांसाठी इस्रायल देशामध्ये रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे. जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, अमरावती आणि एनएसडीसी यांच्या संयुक्त विद्यमाने इस्रायलमधील 'रिनोवेशन कन्स्ट्रक्शन' क्षेत्रात एकूण 2600 जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या संधीचा जास्तीत जास्त पात्र उमेदवारांनी लाभ घ्यावा, असे आवाहन सहायक आयुक्त श्रीमती प्रांजली बारस्कर यांनी केले आहे.
या भरती प्रक्रियेअंतर्गत विविध तांत्रिक कामांसाठी पदसंख्या उपलब्ध आहे. यामध्ये प्रामुख्याने प्लास्टरिंग वर्क (हजार जागा), सिरेमिक टायलिंग (हजार जागा), ड्रायवॉल वर्कर (300 जागा) आणि मेसन (300 जागा) यांचा समावेश आहे. बांधकाम क्षेत्रातील अनुभव असलेल्या उमेदवारांसाठी परदेशात काम करण्याची ही उत्तम संधी आहे. इच्छुक उमेदवारांनी या रोजगाराच्या संधीचा लाभ
घेण्यासाठी maharestransinterna
Post a Comment
0 Comments