Type Here to Get Search Results !

Gramin Uday Logo

Gramin Uday Logo

शहर वाहतुकीत तात्पुरता बदल पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे पोलीसांचे आवाहन


अमरावती, दि. २३ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क) : वेलकम टी पॉइंट ते कांता नगर मार्गावर (पाथवे- हॅपी स्ट्रीटवर) मॉनिंग वॉक करणाऱ्या नागरिकांसाठी सकाळी वेलकम टी पॉइंट ते बियाणी चौक मार्गावरील वाहतुक बंद ठेवण्यात येत असल्याची माहिती अमरावती शहर वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त रमेश धुमाळ यांनी दिली आहे.

 हे मार्ग बंद असतील

वेलकम टी पॉइंट कडून बियाणी चौकाकडे येणार एकतर्फी मार्ग कालावधी रविवार दि. 28 डिसेंबर 2025 या तारखेस सकाळी 6 ते रात्री 8 वाजेपर्यंत बंद राहील.

   हे असतील पर्यायी मार्ग

वेलकम टी पॅाईंट व पंचवटी चौकापासून कांता नगर चौक किंवा प्रादेशिक परिवहन कार्यालय मार्ग हे पर्यायी मार्ग असतील. वरील वाहतुक नियमन रूग्ण्वाहिका, अग्नीशामक वाहन, कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या अत्यावश्यक सेवेच्या वाहनांना लागू राहणार नाही. वाहतुक परिस्थितीनुसार वाहतुक थांबविणे व वळविणे याबाबत सर्व अधिकार वाहतुक विभागास राहील. तसेच अत्यावश्यक वेळी जनहित लक्षात घेता पोलीस उपायुक्त वाहतुक यांना कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीकोनातून नियोजित अधिसूचनेमध्ये वाहतुकीच्या नियमनाबाबत अंशत: बदल करता येतील.


Tags

Post a Comment

0 Comments