स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका: आज अर्ज माघारीचा शेवटचा दिवस - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Thursday, November 20, 2025

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका: आज अर्ज माघारीचा शेवटचा दिवस



 राजकीय समीकरणे स्पष्ट होणार

दि.२१ मुंबई:
राज्यातील आगामी नगरपरिषद आणि नगरपालिका निवडणुकांचे चित्र आज (शुक्रवार, २१ नोव्हेंबर) स्पष्ट होणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस असल्याने, खऱ्या अर्थाने निवडणुकीच्या रिंगणात कोण कायम राहणार आणि कोण माघार घेणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
अर्ज माघारीची मुदत संपल्यानंतर अनेक ठिकाणी बंडखोरी शमण्याची शक्यता वर्तवली जात आहे. प्रमुख राजकीय पक्षांनी, विशेषतः महायुती (भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी) आणि महाविकास आघाडीतील (काँग्रेस, शिवसेना (उबाठा), राष्ट्रवादी (शरद पवार गट)) नेत्यांनी, आपल्या पक्षातील नाराज उमेदवारांची मनधरणी करण्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न सुरू ठेवले आहेत.
अनेक प्रभागांमध्ये पक्षाच्या अधिकृत उमेदवाराविरुद्ध उभ्या असलेल्या बंडखोर उमेदवारांची संख्या मोठी आहे. पक्षादेश झुगारून निवडणूक लढवणाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई होण्याची शक्यता आहे.काही ठिकाणी स्थानिक पातळीवर तडजोडी करून बिनविरोध निवड करण्याचा प्रयत्न केला जात आहे. पुण्यातील राजगुरुनगर येथील नगरसेवक पदासाठी लागलेली विक्रमी बोली, हे त्याचेच एक उदाहरण मानले जात आहे.जागावाटपावरून महायुतीच्या घटक पक्षांमध्ये अनेक ठिकाणी तणाव दिसून आला होता. त्यामुळे माघारीनंतरही काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती कायम राहण्याची शक्यता आहे.
आज दुपारपर्यंत अर्ज माघारीची प्रक्रिया पूर्ण होईल आणि त्यानंतर प्रत्येक प्रभागातील उमेदवारांची अंतिम यादी जाहीर होईल. यानंतरच, निवडणुकीचा प्रचार खऱ्या अर्थाने रंगणार आहे.

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages