शंकरराव शिक्षण संस्थेत "मामाच्या गावाला जाऊया" अभिनव कार्यक्रम, कार्यक्रमात पद्मभूषण डॉ.विजय भटकर यांचा विजय गौरव - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Thursday, November 20, 2025

शंकरराव शिक्षण संस्थेत "मामाच्या गावाला जाऊया" अभिनव कार्यक्रम, कार्यक्रमात पद्मभूषण डॉ.विजय भटकर यांचा विजय गौरव



दि.२१ करजगाव : भारताचे सुपुत्र आणि जगप्रसिद्ध संगणक शास्त्रज्ञ पद्मभूषण डॉ. विजय भटकर यांच्या बालपणीच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी व त्यांच्या अतुलनीय देशसेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी श्री शंकरराव शिक्षण संस्था, करजगाव येथे १९ नोव्हेंबर रोजी "मामाच्या गावाला जाऊया" हा अभिनव कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. डॉ. भटकर यांच्या मातोश्री स्व. निर्मलाताई पांडुरंगजी भटकर यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून या वैशिष्ट्यपूर्ण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. ग्रामीण भागाचा उत्कर्ष, पर्यावरण संदेश दिंडी, वृक्षारोपण आणि गुणवंतांचा गौरव, अशा विविध कार्यक्रमांमुळे हा सोहळा विशेषत्वाने लक्षवेधी ठरला.

या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे डॉ. विजय भटकर यांचा जीवन कार्य गौरव सोहळा. डॉ. भटकर यांचे बालपण करजगाव (मामाचे गाव) येथे त्यांच्या आजी स्व. शांताबाई कृष्णाजी चौधरी (शिक्षिका) यांच्या सहवासात गेले. आजीने त्यांच्यावर केलेले संस्कार व दिलेले राष्ट्रहिताचे अमृत यामुळेच त्यांना 'परम' महासंगणकाची निर्मिती करण्याची प्रेरणा मिळाली.

 कार्यक्रमाचा शुभारंभ डॉ. भटकर यांच्या आजीच्या राहत्या घरी म्हणजेच आताचे जयकृष्ण अकोलकर यांच्या निवासस्थानी तुळशी रोपट्याचे रोपण करून पर्यावरण संदेश दिंडीच्या गजरात करण्यात आला. याचे उद्घाटन संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे इन्क्यूबेशन सेंटरचे सीईओ डॉ. आनंद यादव यांनी केले. त्यानंतर स्पर्धाचे बक्षीस वितरण आणि गुणवंतांचा सन्मान करण्यात आला. श्री शंकरराव शिक्षण संस्थेचे अध्यक्ष संदीप सोनार, कुलगुरू डॉ. मिलिंद बारहाते, प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे, श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे कार्यकारिणी सदस्य हेमंत काळमेघ, भैय्यासाहेब मेटकर उपस्थित होते. या सोहळ्याला स्व. माजी कुलगुरू डॉ. दिलीप मालखेडे यांचे जन्मगाव असण्याची पार्श्वभूमी होती. डॉ. भटकर यांनी मालखेडे परिवाराशी संवाद साधून त्यांना भावनिक आधार दिला.

या सोहळ्यात डॉ. भटकर यांच्या हस्ते विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. यामध्ये श्री शंकरराव शिक्षण संस्थेला बहुमोल शैक्षणिक कार्याबद्दल विशेष गौरवण्यात आले. संस्थेचा १०५ वर्षांपासून शिक्षणाचा अविरत प्रवाह जपल्याबद्दल हा सन्मान मिळाला.

डॉ. भटकर यांच्या पुस्तक लेखन कार्याशी संबंधित लेखक, ओडिसी नृत्यांगना, शैक्षणिक क्षेत्रात प्राविण्य मिळवणारे विद्यार्थी, आणि पर्यावरण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे मान्यवर यांचा यावेळी गौरव करण्यात आला. ग्रामीण भागाचा उत्कर्ष या विषयावर बाभूळगाव-अकोला अभियांत्रिकी व तांत्रिकी महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघटनेद्वारा आयोजित संशोधन वर्किंग मॉडेल स्पर्धेचे उद्घाटन देखील झाले

या भव्य सोहळ्याचे आयोजन श्री शंकरराव शिक्षण संस्था, स्व. दादासाहेब काळमेघ स्मृती प्रतिष्ठान, अमरावती, गाडगेबाबा मंडळ, दर्यापूर, आणि माजी विद्यार्थी संघटना- अभियांत्रिकी व तांत्रिकी महाविद्यालय बाभूळगाव अकोला यांसारख्या अनेक संस्थांनी संयुक्तपणे परिश्रम घेऊन केले होते. या उपक्रमामुळे करजगाव गावाला एका उत्सवाचे स्वरूप प्राप्त झाले होते.

 




Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages