हुतात्मा दिनानिमित्त मुख्यमंत्र्यांकडून हुतात्म्यांना आदरांजली - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Thursday, November 20, 2025

हुतात्मा दिनानिमित्त मुख्यमंत्र्यांकडून हुतात्म्यांना आदरांजली

 




 हुतात्मा चौकात अभिवादनासाठी जनसमुदाय  

महाराष्ट्रात दरवर्षी २१ नोव्हेंबर हा दिवस 'हुतात्मा दिन' म्हणून पाळला जातो. 

दि.२१ मुंबई:
संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी आपल्या प्राणांचे बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दरवर्षी पाळण्यात येणाऱ्या 'महाराष्ट्र राज्य हुतात्मा स्मृतिदिनी' आज (शुक्रवार, २१ नोव्हेंबर) मुख्यमंत्र्यांनी विनम्र अभिवादन केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील ऐतिहासिक हुतात्मा चौक स्मारकावर सकाळी पुष्पचक्र अर्पण केले. यावेळी त्यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील हुतात्म्यांच्या बलिदानाचे स्मरण केले आणि त्यांच्या त्यागाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
२१ नोव्हेंबर १९५५ साली संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील आंदोलनकर्त्यांवर, मुंबईतील फ्लोरा फाऊंटन परीसरात तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांच्या आदेशावरून बेछूट गोळीबार करण्यात आला होता. या गोळीबारात १५ आंदोलनकर्ते जागीच ठार झाले तर ३०० हून अधिक आंदोलनकर्ते गंभीर जखमी झाले होते. त्यावेळच्या सरकारने केलेल्या या अमानुष हत्याकांडानंतर महाराष्ट्र पेटून उठला आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळ अधीक आक्रमक झाली. पुढे जानेवारी १९५६ साली महाराष्ट्रात विविध ठिकाणी आंदोलनकर्त्यांवर झालेल्या गोळीबारात, आणखी ९० आंदोलनकर्त्ये हुतात्मा झाले. या सर्व हुतात्म्यांच्या बलिदानावरच आजचा महाराष्ट्र निर्माण झालांय.संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील या सर्व १०७ हुतात्म्यांना, आज मुंबईतल्या हुतात्मा चौकातील स्मारकात श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे. 
राज्याचे मुख्यमंत्री आणि मुंबईचे महापौर तसेच स्थानिक लोकप्रतिनिधींच्या उपस्थिथीत आज ही सरकारी श्रद्धांजली अर्पण केली जातेय.या सोहळ्यासाठी अनेक मंत्री, लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. हुतात्मा स्मारकावर आदरांजली वाहण्यासाठी मुंबईकरांनी गर्दी केली होती. दिवसभर विविध राजकीय पक्ष आणि संघटनांकडूनही हुतात्म्यांना अभिवादन केले जाणार आहे.
महाराष्ट्राच्या निर्मितीचा पाया रचणाऱ्या हुतात्म्यांच्या स्मृती जागृत ठेवणे आणि त्यांच्या आदर्शांवर चालणे, हे आपले कर्तव्य असल्याचे यावेळी उपस्थित मान्यवरांनी नमूद केले.

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages