समूह साधन केंद्र समन्वयक मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Thursday, November 6, 2025

समूह साधन केंद्र समन्वयक मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा


              * सुधारित निवेदन जाहीर ; जानेवारी/फेब्रुवारी 2026 मध्ये परीक्षा होणार     

 

अमरावती, दि. 07 : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्यावतीने आयोजित करण्यात येणाऱ्या समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्र प्रमुख) मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा-2025 या परीक्षेबाबत सुधारित प्रसिद्धी निवेदन जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार सदर परीक्षा ही आता माहे जानेवारी किंवा फेब्रुवारी 2026 मध्ये ऑनलाईन पध्दतीने होणार आहे, असे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.

यापूर्वी जाहीर केल्याप्रमाणे ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीने दि. 01 ते 05 डिसेंबर 2025 दरम्यान घेण्यात येणार होती. तथापि, काही तांत्रिक व प्रशासकीय कारणांमुळे या परीक्षेचे आयोजन आता जानेवारी / फेब्रुवारी 2026 मध्ये करण्यात येणार असून, सुधारित तारखा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या www.mscepune.in या अधिकृत संकेतस्थळावर लवकरच प्रसिद्ध केल्या जातील, असे परिषदेतर्फे कळविण्यात आले आहे.

सदर परीक्षेसाठी ऑनलाईन आवेदनपत्र भरण्याची अंतिम मुदत पूर्वी 10 नोव्हेंबर 2025 होती. आता ती वाढवून 1 जानेवारी 2026 पर्यंत करण्यात आली आहे. त्यामुळे उमेदवारांचा अनुभव व शैक्षणिक पात्रता विचारात घेण्यासाठी 1 जानेवारी 2026 ही अंतिम तारीख मानण्यात येईल.

या परीक्षेद्वारे महाराष्ट्रातील सर्व जिल्हा परिषदांमधील कार्यरत प्राथमिक शिक्षकांना केंद्रप्रमुख पदावर नियुक्तीची संधी मिळणार आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी वाढीव मुदतीत ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावेत, असे आवाहन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी केले आहे.


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages