८ नोव्हेंबरला शिरसगाव कसबा कार्तिक त्रिजंठा उत्सव भव्य मिरवणुक - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Thursday, November 6, 2025

८ नोव्हेंबरला शिरसगाव कसबा कार्तिक त्रिजंठा उत्सव भव्य मिरवणुक



धनुष्यधारी राम- लक्ष्मण रथाचे दर्शनासाठी राज्यभरातून लाखो भाविक येणार

शिरसगाव कसबा  दिनांक ७ डींगाबर सुने (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क)

चांदूरबाजार तालुक्यातील शिरसगाव कसबा येथे एक शतकापासून कार्तिक स्वामी त्रिजंठा उत्सव साजरा केला जात आहे. विदर्भामध्ये येथेच एकमेव कार्तिक स्वामी भुयारातील मंदिर आहे. ८ नोव्हेंबरला अतिशय भव्य प्रमाणात हा उत्सव येथे साजरा होणार आहे.  लाखो भाविक येथे येणार असून शिरजगाव नगरीला पंढरपूरचे स्वरूप प्राप्त होणार आहे.

     झेंडूचे फुलांनी सजविलेले रथ अवाढव्य गरुड, डायनासोर, हनुमंत ,मोर यांच्या  प्रतिकृती तयार करण्यात आलेले आहे. रथामध्ये धनुष्यबाण घेऊन राम-लक्ष्मण बसलेले किमान २० रथ भव्य मिरवणुकीत राहणार आहे.

पौराणिक महत्त्व लाभलेल्या मेघा नदीच्या काठावर सातपुडा पर्वता शेजारचे शिरजगाव कसबा "कार्तिक स्वामी त्रिजंठा" उत्सवाला शिवपुरातील पौराणिक संदर्भ आहे . दैत्याचा राजा तारकासुर अतिशय उन्नमत झाला होता व देवाधिकांना त्राही_ त्राही करून सोडले होते त्यामुळे सर्व देवता वैकुंठपतीस शरण गेले त्यावेळेस ब्रम्हा व विष्णू ने सांगितले की, शिवपार्वती एकत्र येऊन जो पुत्र तयार होईल त्याच्या हस्ते तारकासुराचे मरण अटळ आहे. तेव्हा शिवपुत्र कार्तिक यांनी अश्विनी पौर्णिमेपासून सर कार्तिकी पौर्णिमेपर्यंत कठोर तपश्चर्या करून तारकासुराशी युद्ध केले होते ब्रह्मास्त्र व सर्व  शस्त्रात्रे कार्तिकी यांनी गिळून तारकासुराला शत्रहीन केले होते पौर्णिमेनंतर ३ दिवसांनी म्हणजे कार्तिक कृष्ण  त्रिजंठा या दिवशी तारकासुराला महिन्याभरातील सर्व काकडे एकत्र करून दहन केले आणि स्वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण केले अशी आख्यायिका आहे.

     ‌‌ कार्तिक स्वामी मंदिराच्या वरच्या बाजूला साईबाबा चे मंदिर व भुयारात जाताना पंचमुखी कार्तिक स्वामी ची मूर्ती विराजमान आहे.मागच्या बाजूला वाहन मोर उभा आहे .

      या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे साईबाबा व गणेश जी चे दर्शन स्त्रियांना घेता येते परंतु कार्तिक स्वामीचे दर्शन घेण्यास स्त्रियांना मुख्य गाभाऱ्यात प्रवेश नसतो, याबाबत  पौराणिक संदर्भ असा जोडला आहे की, गणपतीने आपल्या मातापित्या समोर लग्नासाठी हट्ट धरला होता हा पेच सोडविण्यासाठी त्यांनी पण ठेवला जो कोणी प्रथम विश्व परिक्रमा पूर्ण करून येईल त्याचे प्रथम लग्न केले जाईल कार्तिकेय मोर वाहनावर बसून प्रदर्शना करण्यास निघाला गणपती मात्र तिथेच थांबला कार्तिक प्रदक्षिणा पूर्ण करून येताना दिसताच गणपतीने आई-वडिलां भोवती प्रदक्षिणा पूर्ण करून माता पितांना नमस्कार केला , कार्तिकेयेने आल्यानंतर निर्णय विचारला तेव्हा गणपतीने विश्व परिक्रमा पूर्ण केली आहे. त्यामुळे त्याचे लग्न प्रथम होईल असा निर्णय ऐकल्यावर कार्तिकीय म्हणाला हा निर्णय चुकीचा आहे. त्या वेळी कार्तिकेला राग आला आणि त्यांनी स्त्री जातीला शाप दिला जी स्त्री माझे तोंड पाहिल ती स्त्री ७ जन्मापर्यंत विधवा होईल त्यामुळे या मंदिराचे मुख्य गाभाऱ्यात स्त्रियांना प्रवेश नसतो.

कार्तिक कृष्ण तृतीयेला गावातील किमान 20 मंडळे प्राचीन काळातील त्यांची पुनरावृत्ती दर्शक धार्मिक परंपरा करीत आहे . त्यात राम-लक्षणाचा देखावा केला जात आहे. गावातील मुख्य रस्त्यावरून भव्य मिरवणूक रथापुढे दिंड्या भजन, मंडळी प्रबोधनात्मक कार्यक्रम सादर करीत  कार्तिक मंदिराला प्रदक्षिणा करून आपल्या मंडळामध्ये जातात व तेथे प्रत्येक मंडळ दहीहंडीचा कार्यक्रम साजरा केला जातो सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येतात या उत्सवाला राज्यभरातून लाखो भावी दर्शनाला येत आहे.

या कार्यक्रमाचे विशेष या दिवशी लाखो भाविकांना प्रत्येक मंडळा मध्ये महापंगत द्वारे महाप्रसाद सहभोजन देण्यात येत असते गावातील कोणतेही घरी या दिवशी भोजन तयार केले जात नाही .सर्व गावातील नागरिक व बाहेरून आलेले लाखो भावीक मंडळांमध्ये सहभोजन घेत असतात हे विशेष आहे.


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages