अमरावती, दि. 22 (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क) : सेंट्रल बैंक ऑफ इंडियातर्फे व्यावसायिकांना कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी काल व्यावसायिकांचा मेळावा आयोजित करण्यात आला. या मेळाव्यात 48 कोटी रूपयांचे कर्जवाटप करण्यात आले.
सेंट्रल बॅंक ऑफ इंडियाद्वारे दस्तूरनगर येथील एमआयडीसी असोशिएशन हॉल MSME क्रेडिट आउटरीच कॅम्पचे आयोजन करण्यात आले. एमआयडीसी असोशिएशनचे अध्यक्ष किरण पातुरकर अध्यक्षस्थानी होते. यावेळी सेंट्रल बँक ऑफ इंडिया झोनल ऑफिस पुणेचे सहायक महाप्रबंधक नयनकुमार सिन्हा, अभिनंदन बँकचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिाकरी शिवाजी देठे, सेंट्रल बँक अमरावतीचे क्षेत्रिय प्रमुख सुनील पाण्डेय उपस्थित होते.
श्री. पातूरकर यांनी बँकेने व्यावसायिकांपर्यंत पोहोचण्यासाठी कर्ज मेळाव्याचा उपक्रम स्तुत्य आहे. मेळाव्यात देण्यात आलेल्या विविध योजनांची माहिती मिळाल्याने व्यावसायिकांच्या शंकाचे समाधान झाले आहे. येत्या काळात व्यावसायिक बँकेचे कर्ज घेण्यास समोर येतील. बँकेच्या सहकार्याने उद्योगास चालना मिळणार असल्याने बँकेने उद्योजकांप्रती सकारात्मकता बाळगावी, असे आवाहन केले.
उपस्थितांना नयनकुमार सिन्हा, शिवाजी देठे आणि अग्रणी बँक व्यवस्थापक नरेश हेडाऊ यांनी मार्गदर्शन केले. मुख्य प्रबंधक दीपक दाभोले यांनी सेंट्रल बँकेच्या विविध योजनांचे सादरीकरण केले. सुनील पाण्डेय यांनी प्रास्ताविक केले. निलेश मुंढेकर यांनी सूत्रसंचालन केले. अक्षय वैष्णव यांनी आभार मानले.
Post a Comment
0 Comments