जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते आंतरराष्ट्रीय खेळाडूचा सत्कार - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Friday, November 21, 2025

जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते आंतरराष्ट्रीय खेळाडूचा सत्कार




अमरावती, दि. 22 (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क)
 : ढाका (बांगलादेश) येथे झालेल्या एशियन आर्चरी चॅम्पियनशिप 2025 स्पर्धेत जिल्ह्यातील खेळाडू यशदीप भोगे याने वैयक्तिक प्रकारात सुवर्णपदक प्राप्त केले. यानिमित्ताने जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात त्याचा सत्कार केला.

यावेळी आमदार सुलभा खोडके, कार्यकारी अभियंता प्रतिक गिरी, विनोद पिदुरकर, उपअभियंता एन. प्रकाश रेड्डी, जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव, मनपा शिक्षणाधिकारी डॉ. प्रकाश मेश्राम, पोलिस निरीक्षक आनंद पिदूरकर, गटशिक्षणाधिकारी श्री. मोहने, आदी उपस्थित होते.

यशदीप भोगे याने आर्चरी चॅम्पियनशिपमध्ये क्वालिफिकेशन राऊंडमध्ये जागतिक क्रमवारीत नंबर एकचा कोरियाच्या खेळाडूसोबत क्वॉलिफिकेशन राऊंड खेळून वैयक्तिक प्रकारात 720 पैकी 687 गुण प्राप्त करून वर्ल्ड आर्चरी चॅम्पियनशिपकरिता निवड झाली आहे. जिल्हाधिकारी श्री. येरेकर आणि आमदार श्रीमती खोडके यांनी आंतरराष्ट्रीय खेळाडूंकरीता अद्ययावत क्रीडा सुविधा, क्रीडा साहित्य त्यांच्या मागणीनुसार उपलब्ध करून द्याव्यात. तसेच त्यांच्या मार्गदर्शनाखाली युवा खेळाडू तयार करण्यावर भर द्यावा. इतरांना प्रेरणा मिळावी, यासाठी या खेळाडूंचा सार्वजनिक कार्यक्रमात सत्कार करण्यात यावा, अशी सूचना केली.

यावेळी क्रीडा संकुलात उभारण्यात येणाऱ्या वसतिगृहाचा आढावा घेण्यात आला. बांधकामासाठी आवश्यक असलेल्या निधीसाठी प्रयत्न करण्यात यावे. यामुळे 40 मुला-मुलींच्या राहण्याची सोय होणार आहे. इमारतीचे काम अंतिम टप्प्यात असून यानंतर स्केटींगच्या मैदानासाठी निधी मागणी करावी. संपूर्ण क्रीडा संकुलामधील विजेसाठी सोलार यंत्रणा बसविण्यात यावी. तालुका क्रीडा संकुलाचा प्रश्न असून चांगले व्यवस्थापन व्हावे, यासाठी उपाययोजना करण्यात यावी. क्रीडा संकुलातील नव्या समितीमध्ये खेळाडूंचा समावेश करावा. यात प्रामुख्याने धर्नुविद्या खेळातील खेळाडूचा समावेश झाल्यास त्याच्या ज्ञानाचा लाभ होण्यास मदत होणार आहे. तसेच शालेय आणि शासकीय क्रीडा स्पर्धा क्रीडा संकुलात होण्यासाठी प्रयत्न करावेत, अशा सूचनाही श्री. येरेकर यांनी दिल्या.


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages