परराज्यातील पशूंचा संसर्ग टाळण्यासाठी उपाययोजना करावी -जिल्हाधिकारी आशिष येरेकर - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Thursday, November 13, 2025

परराज्यातील पशूंचा संसर्ग टाळण्यासाठी उपाययोजना करावी -जिल्हाधिकारी आशिष येरेकर




अमरावती, दि. १४ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क) : इतर राज्यातून येणाऱ्या पशूंमुळे लंपीसारख्या आजार संसर्गामुळे झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यात येणाऱ्या प्रत्येक पशूची तपासणी करून टॅगींग करावे, तसेच संसर्ग टाळण्यासाठी दक्ष राहून उपाययोजना करावीत, असे निर्देश जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात काल  पशूसंवर्धन आणि दुग्ध विकासासंदर्भात बैठक पार पडली. यावेळी पशूसंवर्धनचे उपायुक्त डॉ. कावरे, विदर्भ मराठवाडा दुग्ध विकास प्रकल्पाचे डॉ. आडे आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी, जिल्ह्यातील पशूधनाचे आजारापासून संरक्षण करून पशूधनाचा विकास साधावा, यासाठी प्रयत्न करावेत. यासाठी पशू पालकांचा गट तयार करावा. प्रामुख्याने चिखलदरा आणि धारणी भागात लाभार्थी शोधून त्यांनाही योजनांचा लाभ देण्यात यावा. जिल्ह्यात अशा प्रकारचे गट निर्माण झाल्यास त्यांना शासनाच्या योजनांचा लाभ देण्यात येतील. यातून जिल्ह्यात दुधाळ जनावरांची संख्या वाढण्यास मदत होईल. तंत्रज्ञान, खाद्य, आरोग्याची काळजी घेतल्यास दुध संकलनात वाढ होण्यास निश्चितच मदत होणार आहे.

पशूसंवर्धन विभागातर्फे दुधाळ जनावरांचे वाटप अनुदानावर करण्यात येते. यात चांगले कार्य करण्यासाठी क्षेत्रियस्तरावर कार्यरत यंत्रणांनी मार्गदर्शन करावे. वैरण विकास योजनेत चारा उत्पादन होण्यासाठी प्रयत्न करावेत. तसेच चांगल्या प्रजाती निर्माण होण्यासाठी कृत्रिम रेतनासाठीही प्रयत्न करण्यात यावेत. यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येईल. चांगल्या पशूधनाचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे. पशूपालक आणि शेतकरी हे एकत्रित असल्याने कृषि विभागानेही यात नियोजन करावे, तसेच पशूविकास आणि दुग्ध व्यवसायातून कृषि उद्योजक तयार करावेत, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages