अवैध दत्तक प्रक्रियेला आळा घालण्यासाठी आंतरराष्ट्रीय दत्तक महिन्यानिमित्त विविध उपक्रम - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Thursday, November 13, 2025

अवैध दत्तक प्रक्रियेला आळा घालण्यासाठी आंतरराष्ट्रीय दत्तक महिन्यानिमित्त विविध उपक्रम




अमरावती, दि. १४ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क): अमरावती जिल्ह्यामध्ये महिला व बाल विकास विभागामार्फत दि. 1 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर 2025 हा कालावधी आंतरराष्ट्रीय दत्तक महिना  म्हणून साजरा करण्यात येत आहे. दत्तक प्रक्रियेस प्रोत्साहन आणि प्रेरणा देण्यासाठी तसेच कारा (CARA), नवी दिल्ली यांच्या स्तरावरुन कायदेशीर दत्तक प्रक्रियेची जागरूकता आणणे या उद्देशाने जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय दत्तक महिना 2025 साजरा करण्यात येत आहे. या महिन्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

जिल्हास्तरावरील बालकांसंदर्भात काम करणाऱ्या यंत्रणांमार्फत ठोस दिशादर्शक कार्यप्रणाली तयार करण्यात येत असून विशेष दत्तक संस्थेतील बालकांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे. जिल्हयात दत्तक विषयासंबंधी काम करणाऱ्या अशासकीय आणि विशेष दत्तक संस्था यांची बालकांची देखरेख व काळजी घेण्याच्या अनुषंगाने विशेष कार्यशाळा आयोजित करून मार्गदर्शन करण्यात येईल. तसेच जिल्ह्यातील सर्व प्रसुतिगृहे, रुग्णालये, महानगर पालिका परिसर आणि शासकीय कार्यालय परिसरात कायदेशीर व सुरक्षित दत्तक प्रक्रिया समर्पण याबाबत माहितीचे फलक दर्शनीय भागात लावण्याचे ठरविण्यात आले आहे. त्या माध्यमातून अवैधरित्या दत्तक प्रक्रियेला आळा घालण्यात येईल, अशी माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी  विलास मरसाळ यांनी दिली.


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages