शासनमान्य ग्रंथ यादीसाठी प्रकाशित ग्रंथ पाठविण्याचे आवाहन - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Friday, October 10, 2025

शासनमान्य ग्रंथ यादीसाठी प्रकाशित ग्रंथ पाठविण्याचे आवाहन

अमरावती, दि. ११ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क): ग्रंथालयांनी खरेदीसाठी मार्गदर्शन ठरणारी ग्रंथ यादी तयार करण्यासाठी जिल्ह्यातील 2024 या वर्षातील प्रकाशित ग्रंथ पाठविण्यात यावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

राज्यातील शासकीय, शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांना राज्यात मराठी भाषेत प्रकाशित झालेल्या ग्रंथांची माहिती आणि खरेदीसाठी मार्गदर्शक ठरावी यासाठी ग्रंथालय संचालनालयाकडून ग्रंथ निवड समितीच्या सदस्यांनी शिफारस केलेली वर्षनिहाय शासनमान्य ग्रंथांची यादी प्रकाशित करण्यात येते. या शासनमान्य ग्रंथ यादीसाठी 1 जानेवारी 2024 ते 31 डिसेंबर 2024 वर्षात प्रकाशित झालेल्या मराठी भाषेतील ग्रंथांची निवड करण्यासाठी आणि शासनमान्य ग्रंथांच्या यादीत समावेश होण्याच्या दृष्टीने सन 2024 या कॅलेंडर वर्षामध्ये प्रकाशित झालेल्या व प्रथम आवृत्ती असलेल्या ग्रंथांची प्रत्येकी एक प्रत विनामुल्य ग्रंथालय संचालक, ग्रंथालय संचालनालय, नगर भवन, टाऊन हॉल, मुंबई-४०० ००१ यांच्याकडे दि. 15 ऑक्टोबर 2025 पर्यंत पाठविण्यात यावीत. सन 2024 वर्षातील प्रकाशित ग्रंथ यापूर्वी संचालनालयास पाठविले असल्यास पुन्हा पाठविण्याची आवश्यकता नाही, असे जिल्हा ग्रंथालय अधिकारी डॉ. सुरज मडावी, यांनी कळविले आहे.


--

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages