अमरावती. दि. ४ : राज्य शासनाच्या वतीने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे कार्यालयामार्फत महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (TET) २०२५ रविवार दि. २३ नोव्हेबर २०२५ रोजी घेण्याचे नियोजित आहे.
अतिवृष्टी व पुरस्थिती मुळे आवेदन पत्र भरून न शकणाऱ्या उमेदवारासाठी ऑनलाईन आवेदन पत्र भरण्यासाठी ९ ऑक्टोबर पर्यंत मुदत वाढ देण्यात आली आहे असे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी प्रसिद्धी पत्रकारद्वारे कळविले आहे.
या परीक्षेचे ऑनलाईन आवेदनपत्र भरण्याचा कालावधी दि. १५ सप्टेंबर ते ३ ऑक्टोबर २०२५ पर्यंत होता, परंतु महाराष्ट्रात काही जिल्हयामध्ये अतिवृष्टी व पुरस्थिती निर्माण झाल्याने परीक्षार्थी/उमेदवारांना ऑनलाईन आवेदनपत्र भरण्यास अडचणींना सामोरे जावे लागल्याने परीक्षार्थी/उमेदवारांना ऑनलाईन आवेदनपत्र भरण्यासाठी दि. ४ ऑक्टोबर २०२५ ते ९ ऑक्टोबर २०२५ रात्री ११:५९ पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे.
विद्यार्थी उमेदवारांना तांत्रिक अडचणीमुळे परीक्षा शुल्क भरता न आल्यामुळे संबंधित परीक्षार्थी उमेदवारांना नेट बैंकिंग/डेबिट कार्ड/क्रेडिट कार्ड द्वारे दि. ९ ऑक्टोबर २०२५ रात्री ११:५९ पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे, यानंतर कोणत्याही परिस्थितीत मुदतवाढ मिळणार नाही. याची संबंधित परीक्षार्थी/उमेदवारांनी नोंद घ्यावी, असे महाराष्ट्र राज्य परिषदेव्दारे कळविण्यात आले आहे.
Post a Comment
0 Comments