62 जणांची प्राथमिक निवड
अमरावती, दि. १७ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क): जिल्हा, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, अमरावती आणि मॉडेल करिअर सेंटर अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्लेसमेंट ड्राईव्ह चे आयोजन नुकतेच करण्यात आले. या रोजगार मेळाव्यामध्ये जिल्ह्यासह परिसरातील विविध तालुक्यांमधून 168 उमेदवारांनी सहभाग नोंदविला.
उमेदवारांसाठी ऑनलाइन तसेच ऑफलाइन अशा दुहेरी पद्धतीने नोंदणीची सोय उपलब्ध करण्यात आली होती. मेळाव्यात दहावी, बारावी, पदविका धारक, पदवीधर तसेच तांत्रिक शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार रोजगार मिळावा यासाठी एकूण 6 नामांकित कंपन्यांनी सहभाग घेतला. यामध्ये रेमंड लक्झरी कोटन प्रा.लि. अमरावती, सहयोग मल्टी बँक लि. अमरावती, प्लास्टी सिमैक आय टी, प्लास्टी सर्ज अमरावती, जाधव गियर्स प्रा.लि. आणि सत्या माइक्रो फायनान्स प्रा.लि. अमरावती यांसारख्या कंपन्यांचा समावेश होता. या कंपन्यांनी विविध क्षेत्रातील एकूण 128 पदांसाठी मुलाखत प्रक्रिया राबवली. विविध कंपन्यांचे प्रतिनिधी थेट मेळाव्याच्या ठिकाणी उपस्थित राहून त्यांनी 126 उमेदवारांची प्रत्यक्ष मुलाखत घेतली. या प्लेसमेंट ड्राईव्हद्वारे 62 उमेदवारांची प्राथमिक निवड आणि 3 उमेदवारांची अंतिम निवड जागेवरच करण्यात आली.
Post a Comment
0 Comments