क्रीडा साहित्य अनुदानासाठी अर्ज करण्याचे आवाहन - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Friday, October 17, 2025

क्रीडा साहित्य अनुदानासाठी अर्ज करण्याचे आवाहन



संस्थांना १४ लाखांपर्यंत अर्थसहाय्य

 अमरावती, दि. १७ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क): क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत राज्य, जिल्हास्तरावर क्रीडा विकासाचे उपक्रम राबविण्यासाठी तसेच गुणवंत गरजू खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासनाअंतर्गत क्रीडा विकासासाठी 14 लक्ष मर्यादेपर्यंत अर्थसहाय क्रीडा साहित्य व व्यायाम साहित्य अनुदान देण्यासाठी शैक्षणिक संस्था क्रीडा संघटना मंडळे शासकीय संस्था यांचेकडून तीन प्रतीत प्रस्ताव सादर करण्याबाबत कळविण्यात येत आहे.

व्यायाम साहित्याकरीता 500 चौरस फुट हॉल असणे आवश्यक आहे. व तसेच क्रीडा साहित्यासाठी प्रत्यक्ष क्रीडागंणासाठी राखीव जागा असणे आवश्यक आहे. सदरची जागा ही स्वमालकीची 7/12, 8 अ अथवा दीर्घ मुदतीचा करारनामा असावा. लाभार्थी संस्थांना क्रीडा व व्यायाम साहित्य प्रचलीत दर करारानुसार पुरवठा करण्याबाबतची कार्यवाही संचालनालयाचे सहमतीने करण्यात येईल.

शैक्षणिक संस्था यामध्ये राज्यातील खाजगी अनुदानातील विनाअनुदानीत प्राथमिक माध्यमिक विद्यालय आश्रम शाळा तसेच क्रीडा संघटना मंडळे यांच्यासाठी नोंदणीकृत असलेल्या एकविध खेळाच्या संघटना, खाजगी क्लब, क्रीडा मंडळ, युवक मंडळ यांना अर्ज करता येईल. तसेच शासकीय विभाग, पोलीस विभाग, स्पोर्ट क्लब, ऑफीसर्स क्लब आणि शासकीय महाविद्यालय हे अनुदानासाठी पात्र असतील. राज्य क्रीडा विकास निधीतून अर्थ सहाय्यासाठी अर्ज नमुना जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात उपलब्ध असून त्यानुसार आवश्यक कागदपत्रासह परीपुर्ण प्रस्ताव जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयास सादर करावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी केले आहे.


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages