मॅट्रीकपूर्व शिष्यवृत्ती अर्ज; शाळांना नोंदणीचे निर्देश - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Thursday, October 16, 2025

मॅट्रीकपूर्व शिष्यवृत्ती अर्ज; शाळांना नोंदणीचे निर्देश



अमरावती, दि. १७ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क): सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध मॅट्रीकपूर्व शिष्यवृत्ती योजनांचे अर्ज भरण्याकरिता शैक्षणिक वर्ष २०२५-२६  साठी ऑनलाईन महाडीबीटी प्रणाली कार्यान्वित करण्यात आलेली आहे. इयत्ता ९ वी, १० वी मध्ये शिकणाऱ्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना मॅट्रीकपूर्व शिष्यवृत्ती, साफसफाई व आरोग्यास धोकादायक क्षेत्रात काम करणाऱ्या पालकांच्या पाल्यांना मॅट्रीकपूर्व शिष्यवृत्ती, तसेच ५ वी ते १० वी मधील अनुसूचित जातीच्या विद्यार्थीनींना सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती यांसारख्या महत्त्वाच्या योजनांचा यात समावेश आहे.

या योजनांची ऑनलाईन अर्ज नोंदणी करण्याकरिता शाळेतील मुख्याध्यापकांनी http://prematric.mahait.org/Login/Login- या महाडीबीटी प्रणाली वेब लिंकवर मुख्याध्यापक लॉगीन वापरून शाळेचे, मुख्याध्यापकांचे व लिपीकांचे प्रोफाइल तसेच विद्यार्थ्यांचे वैयक्तिक व शैक्षणिक माहितीचे प्रोफाइल तातडीने अद्ययावत करावे. या अनुषंगाने, महाडीबीटी प्रणालीमध्ये पात्र असलेल्या सर्व अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांच्या अर्जाची नोंदणी मुख्याध्यापकांनी करणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील महाडीबीटी प्रणालीवर नोंदणीकृत सर्व शाळेच्या मुख्याध्यापकांनी अनुसूचित जाती प्रवर्गातील योजनांचे ऑनलाईन अर्ज तात्काळ भरण्यात यावेत, असे आवाहन जिल्हा समाज कल्याण अधिकारी ज्ञानबा पुंड यांनी केले आहे.


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages