Type Here to Get Search Results !

Gramin Uday Logo

Gramin Uday Logo

मातोश्री ग्रामसमृद्धी शेत, पांदण रस्ते रस्त्यांमुळे ग्रामीण अर्थकारणाला नवी दिशा


अमरावती, दि. 3 (ग्रामीण उदय प्रतिनिधी) : शेतीत ये-जा करण्यासाठी आवश्यक असलेल्या शेत-पांदण रस्त्यांची  कामांना अमरावती जिल्ह्यात गती मिळाली आहे. मातोश्री ग्रामसमृद्धी शेत, पांदण रस्ते योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या 4203 कामांपैकी, 1 हजार 232 कामांनी प्रत्यक्षात बांधकाम सुरू केले आहे. ज्यामुळे शेतमाल वाहतूक आणि शेतीच्या कामांना मोठा दिलासा मिळणार आहे.

जिल्ह्यातील 4 हजार 203 विकासकामांना गती मिळाली आहे. शासनाने मंजूर केलेल्या कामांना प्रशासकीय यंत्रणेने त्वरित कार्यवाही करत 3 हजार 90 कामांना प्रशासकीय मान्यता दिली आहे. यातील 449 कामे पूर्ण झाली असून, 1 हजार 232 कामे सध्या वेगाने सुरू आहेत. यामुळे ग्रामीण भागातील पायाभूत सुविधा मजबूत होण्यास मदत मिळणार आहे. पूर्ण झालेल्या 449 कामांमुळे नागरिकांना थेट सुविधा मिळण्यास सुरुवात झाली आहे. सध्या सुरू असलेली 1 हजार 232 कामे येत्या काही कालावधीत पूर्ण होवून जिल्ह्यातील रस्ते आणि इतर पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा होईल.

            अनेक पंचायत समित्यांनी विकासकामांना चांगली गती दिली आहे. वरुड पंचायत समितीने सर्वाधिक 140 कामे यशस्वीरित्या पूर्ण केली आहेत. मोर्शी तालुक्यात 661 कामांपैकी 348 कामांना तांत्रिक मान्यता मिळून 202 कामे सध्या प्रगतीपथावर आहेत. चांदूर बाजार मध्ये 504 पैकी 450 कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली असून, सध्या 139 कामे वेगाने सुरू आहेत. प्रशासकीय यंत्रणा मंजूर कामांना तातडीने कार्यान्वित करीत आहे. उर्वरित 1 हजार 113 कामांना तांत्रिक आणि प्रशासकीय मान्यता देण्याचे काम सुरू असून, लवकरच ही कामेही सुरू होतील, असा विश्वास जिल्हा प्रशासनाने व्यक्त केला आहे.



Tags

Post a Comment

0 Comments