परीक्षेचे वेळापत्रक जाहिर ; ३० ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
अमरावती, दि. १५ : राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षेकरिता (NMMS) ऑनलाईन शाळा नोंदणी व विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे महाराष्ट्र राज्य परिषदेच्या http://www.mscepune.in व https://www.mscenmms.in या संकेतस्थळावर भरण्याच्या वेळापत्रकानुसार मुदतवाढ देण्यात आली आहे, याची संबंधित उमेदवारांनी नोंद घ्यावी, असे आवाहन महाराष्ट्र राज्य परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे.
परीक्षेच्या वेळापत्रकाचा तपशील पुढीलप्रमाणे आहे-
नियमित शुल्कासह ऑनलाईन आवेदपत्रे दि. १२ सप्टेंबर ते २१ ऑक्टोबरपर्यंत सादर करता येईल. विलंब व अतिविलंब शुल्कासह आवेदनपत्रे भरण्याचा कालावधी दि. २२ ऑक्टोबर ते ३० ऑक्टोबरपर्यंत असेल. दि. ३० ऑक्टोबरनंतर कोणत्याही परिस्थितीत विद्यार्थ्यांचे ऑनलाईन अथवा ऑफलाईन पध्दतीने आवेदनपत्र भरता येणार नाही, याची संबंधितांनी नोंद घ्यावी, असेही महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेव्दारे कळविण्यात आले आहे.
Post a Comment
0 Comments