Type Here to Get Search Results !

Gramin Uday Logo

Gramin Uday Logo

शासकीय विभागीय ग्रंथालयात वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा



अमरावती, दि. १६ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क): वाचन प्रेरणा व संस्कृतीचा विकास ही एक सातत्याने चालणारी प्रक्रिया आहे. ज्ञानसंपन्न व माहिती समृध्द समाज घडविण्यासाठी वाचन संस्कृतीचा प्रचार, प्रसार व विकास होणे आवश्यक आहे. भारताचे माजी राष्ट्रपती  डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या स्मृती सार्थ रितीने जतन करुन त्यांना आदरांजली अर्पण  करण्यासाठी  आणि विदयार्थ्यांमध्ये व समाजाच्या इतर घटकांना वाचनांची आवड व प्रेरणा निर्माण करणे व वाचनाचे महत्त्व जाणून घेणे  यासाठी दरवर्षी भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दूल कलाम यांचा (15ऑक्टोंबर) हा जन्मदिवस ‘वाचन प्रेरणा दिन’ साजरा करण्यात येत असतो. 

 त्यानिमीत्याने विविध साहित्यकृती, ग्रंथांचे प्रदर्शन शासकीय विभागीय ग्रंथालय व जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने  करण्यात आले. निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर यांच्या हस्ते या ग्रंथ प्रदर्शनाचेउद्घाटन करण्यात आले. 

तहसीलदार विजय लोखंडे, सहाय्यक ग्रंथालय संचालक डॉ. राजेश पाटील, जिल्हा ग्रंथालय अधिकारी डॉ. सुरज मडावी  तसेच ग्रंथालय कर्मचारी,  विदयार्थी व वाचक वर्ग  उपस्थित होते.

श्री. अनिल भटकर यांनी भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या जीवनावर प्रकाश टाकून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. श्री. विजय लोखंडे . यांनी . मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. राजेश पाटील यांनी तर आभार डॉ. सूरज मडावी यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता ग्रंथालयाचे कर्मचारी गजानन कुरवाडे, दीपक गेडाम, अजय इंगळे, शेषराव भिरडे, राजाराम देवकर, श्री.  वानखेडे, श्री.  मिश्रा, योगेश घवडे इत्यादी कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.


Post a Comment

0 Comments