Type Here to Get Search Results !

Gramin Uday Logo

Gramin Uday Logo

समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्र प्रमुख) मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेबाबत महत्वाची सूचना

   सविस्तर जाहिरात www.mscepune.in या संकेतस्थळावर उपलब्ध

 

अमरावती, दि. १६ : राज्यातील सर्व जिल्हा परिषद मधील कार्यरत प्राथमिक शिक्षकांना केंद्रप्रमुख पदावर विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षेद्वारे नियुक्ती देण्यासाठी "समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्र प्रमुख) मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा-2025" या परीक्षेचे ऑनलाईन पध्दतीने दि. 1 ते 5 डिसेंबर 2025 या कालावधीत राज्यातील विविध केंद्रावर आयोजन करण्यात आले आहे. परीक्षेबाबतची अधिसूचना, वेळापत्रक व ऑनलाईन आवेदनपत्राबाबतची माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या www.mscepune.in या संकेतस्थळावर प्रसिध्द आली आहे. तरी परीक्षार्थी उमेदवारांनी वेळोवेळी www.mscepune.in या संकेतस्थळावर भेट द्यावी, असे महाराष्ट्र राज्य परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.

          यासंदर्भात महाराष्ट्र राज्य परिषदेतर्फे पात्रतेसंदर्भात शुध्दीपत्रक जारी करण्यात आले आहे. त्यानुसार जाहिरातीस अनुसरुन निश्चित करण्यात आलेल्या अर्ज स्विकारण्याच्या अंतिम दिनांकास (30 नोव्हेंबर रोजी) उमेदवाराने कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठाची बी.ए./ बी.कॉम./बी.एस.सी. ही पदवी उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. तसेच दि. 28 ऑगस्ट 2025 च्या शाासन निर्णयातील मुद्दा क्रमांक (3) मधील ब) 2) अन्वये 1 जानेवारी 2025 रोजी अखंड नियमित सेवेचा कालावधी परीक्षा देण्यासाठी विचारात घेण्यात येईल. जिल्हा परिषदेच्या प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (प्राथमिक) किंवा प्रशिक्षित शिक्षक (प्राथमिक) या पदावर किमान सहा वर्षे अखंडीत सेवा पूर्ण करणे आवश्यक राहील. तसेच शिक्षण सेवक पदावरील सेवा ग्राह्य धरण्यात येईल. मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेसाठी उमेदवार ज्या जिल्हा परिषदेमध्ये कार्यरत असेल, त्याच जिल्ह्यासाठी निवडीस पात्र राहील, असे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने शुध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे. केंद्र प्रमुख मयादित विभागीय स्पर्धा परीक्षेसंबंधी सविस्तर जाहिरात परिषदेच्या www.mscepune.in या संकेतस्थळावर प्रसिध्द आली आहे, याची सर्व संबंधित उमेदवारांनी नोंद घ्यावी, असेही परिषदेतर्फे कळविण्यात आले आहे.


Post a Comment

0 Comments