Type Here to Get Search Results !

Gramin Uday Logo

Gramin Uday Logo

अवैध सावकारी व्यवहारात शेतकरी व त्यांचे कुटुंबीयांनी निर्भिडपणे तक्रार करावी-अॅड. निलेश केशवराव हेलोंडे पाटील


अमरावती, दि. १७ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क): कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष अॅड. निलेश केशवराव हेलोंडे पाटील यांनी महाराष्ट्र सावकारी नियमन अधिनियम 2014 अंतर्गत अवैध सावकारी तक्रारी संबंधात नुकताच आढावा घेतला. विदर्भ व मराठवाडा विभागात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी बाधंवांचे अतोनात नुकसान झालेले असल्यामुळे शेतकरी व त्यांचे कुटुंबीय आर्थिक  विवचंनेत आहेत. शेतकरी व त्यांचे कुटुंबीयांची अवैध सावकारी व्यवहारात पिळवणुक होऊ नये यासाठी त्यांनी शेतकरी बांधवांनी व व त्यांचे कुटुंबीयांनी निर्भिडपणे तक्रार करावी ,असे आवाहन केले आहे.

अवैध सावकारी व्यवहारात शेतकरी व त्यांचे कुटुंबियांचे फसवणूक, पिळवणूक होत असल्यास त्यांनी अमरावती सहकार विभागात अवैध सावकारी करणाऱ्या सावकाराविरूध्द तक्रार संबंधीत जिल्ह्यातील जिल्हा उपनिबंधक, सरकारी संस्था याचे कार्यालयात तसेच अमरावती जिल्ह्याकरीता जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, अमरावती व उपनिबंधक सहकारी संस्था, तालुका अमरावती सहकार संकूल, कांतानगर अमरावती -444602कार्यालयीन ईमेल क्रमांक ddr_amr @rediffmail.com/dyr.amr.amravati@gmail.com यावर करण्यात याव्यात तसेच तालुका  स्तरावरील सहायक निबंधक, सहकारी संस्था यांचे कार्यालयातही तक्रार नोंदवू शकतात.

जिल्हा उपनिबंधक शंकर कुंभार, उपनिबंधक सुधीर खंबायत,सहायक निबंधक गजानन डावरे, कार्यालय अधीक्षक अनिरुद्ध राऊत,  सत्यजीत पोले,  दिपक गासे, प्रशांत ढोके, सचिन शहाकार, सतिश समर्थ व कार्यालयीन कर्मचारी यावेळी उपस्थित होते.



Post a Comment

0 Comments