शेतकऱ्यांसाठी डिजीटल सहकारी महाविस्तार एआय ॲप लाँच; - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Friday, October 17, 2025

शेतकऱ्यांसाठी डिजीटल सहकारी महाविस्तार एआय ॲप लाँच;


हवामान, बाजारभावाची माहिती जागेवर

            अमरावती, दि. १७ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क): शेतकऱ्यांना हवामान बदल, बाजारपेठेतील अस्थिरता, आणि माहितीच्या अभावामुळे अनेक आव्हानाचा सामना करावा लागतो. यावर उपाय म्हणून कृषि विभागाने महाविस्तार एआय हे अँप लाँच केले आहे. कृत्रिम बुध्दिमत्तेच्या साहाय्याने हे ॲप लाँच केले आहे. कृत्रिम बुध्दिमत्तेच्या साहाय्याने हे ॲप शेतकऱ्यांना शेतीशी संबंधित सर्व गरजा पुर्ण करण्यासाठी एकाच ठिकाणी माहिती उपलब्ध करून देते. मराठी भाषेत उपलब्ध असलेले हे ॲप शेतकऱ्यांना रिअल टाइम माहिती, तज्ज्ञांचा सल्ला आणि आधुनिक शेती पध्दतींचे मार्गदर्शन करणार आहे.

            महाविस्तार एआय ॲपमधील एआय चॅटबॉट शेतकऱ्यांच्या प्रश्रांना त्वरीत उत्तरे देतो. रिअल टाइम हवामान अंदाज स्थानिक पातळीवरील हवामान अंदाजामुळे शेतकरी पेरणी, कापणी आणि खतांचा वापर यांचे नियोजन करू शकतात. स्थानिक आणि राष्ट्रीय बाजारपेठेतील पिकांचे भाव रिअल टाइममध्ये दाखविले जात आहे. या ॲपवर कृषि विभागाच्या विविध कृषि योजनांची माहिती, अनुदान, कर्जमाफी आणि विमा योजनांचे तपशील एकाचा ठिाकणी मिळु शकतील. ॲपमध्ये मराठीत व्हिडीओ उपलब्ध आहेत, ज्यामध्ये पिकांची लागवड, खतांचा वापर, कापणी आणि जैविक शेती याबाबत तपशीलवर मार्गदर्शन मिळेल. ॲपमधील एआय तंत्रज्ञान मध्ये शेतकरी पिकांचे फोटो अपलोड करून पिकांवरील रोग आणि किडींचे निदान करून उपाय मिळू शकतात. शेतकऱ्यांचे जीवन सुसह्य बनवण्यासाठी अनेक फायदे या ॲपमध्ये आहे. त्यामुळे सल्ला त्यांच्या मोबाईलवर मिळतो, ज्यामुळे वेळ वाचतो. चुकीच्या खतांचा किंवा कीटकनाशकांचा वापर टाळून शेतकरी उत्पादन खर्च कमी करू शकतात. बाजारभाव माहिती आणि हवामान अंदाजामुळे शेतकरी योग्य वेळी पिकांची विक्री आणि नियोजन करू शकता, यामुळे त्यांच्या  उत्पन्नात वाढ होऊ शकते.

            गुगल प्ले स्टोअरवर जाऊन आजच महाविस्तार एआय ॲप डाउनलोड करा. शेतीत डिजीटल क्रांतीचा भाग व्हा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी राहुल सातपुते यांनी केले आहे.


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages