आ.प्रविण तायडे यांचे प्रयत्नांना यश,
करजगावच्या वर्षानुवर्षे प्रलंबित मागणीला यश
(ग्रामीण उदय प्रतिनिधी) करजगांव दि.४ :
चांदुरबाजार तालुक्यातील शिरजगांव कसबा पोलिस स्टेशन हद्दीतील गावांची संख्या पहाता तेथील वाढत्या लोकसंख्येचा व भौगोलिक अडचणीचा विचार करता, त्या भागातील वाढती गुन्हेगारी, दिवसेंदिवस फोफावत असलेले अवैध धंदे, महिला अत्याचाराचे वाढते प्रमाण लक्षात घेता यावर कायदेशीररित्या नियंत्रण मिळविण्यासाठी, तसेच दिवसेनदिवस पोलिस यंत्रणेवर येणारा वाढता ताण लक्षात घेता नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी, अचलपूरचे आमदार प्रविण तायडे यांनी शासन स्तरावर पाठपुरावा करत करजगांव येथे कायम स्वरुपी पोलिस चौकी निर्माण करण्याबाबत केलेल्या मागणीवर गृह विभागाने शिक्का मोर्तब करत अप्पर पोलिस महासंचालक कृष्णप्रकाश यांच्या आदेशान्वये शिरजगांव पोलिस स्टेशन हद्दीतील करजगांव येथे पोलिस चौकी निर्मितीला मान्यता देण्यात आली आहे.
यामुळे परिसरातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी तसेच नागरिकांच्या सुरक्षेसाठी अधिक चांगली मदत होणार आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनी केलेल्या मागणीनुसार, हा निर्णय घेण्यात आला आहे. नवीन चौकीमुळे करजगाव आणि आसपासच्या गावांमधील लोकांना पोलीस स्टेशनपर्यंत जाण्याची गैरसोय दूर होऊन तातडीची मदत मिळू शकेल.
या नवीन पोलीस चौकीमुळे परिसरातील कायदा व सुव्यवस्था अधिक मजबूत होण्यास मदत होईल. नागरिकांना आता लहानसहान तक्रारींसाठी किंवा तातडीच्या मदतीसाठी दूर असलेल्या मुख्य पोलीस ठाण्यापर्यंत (उदा. शिरजगाव कसबा) लांबचा प्रवास करण्याची गरज राहणार नाही.
Post a Comment
0 Comments