Type Here to Get Search Results !

Gramin Uday Logo

Gramin Uday Logo

सामाजिक न्याय कार्यालयात ज्येष्ठ नागरिक दिन साजरा



अमरावती, दि. 3 (ग्रामीण उदय प्रतिनिधी) : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर गौरव अभियान अंतर्गत सामाजिक न्याय विभागातर्फे दि,1 ऑक्टोंबर ज्येष्ठ नागरिक दिन साजरा करण्यात आला. यानिमित्ताने 200 हून अधिक ज्येष्ठ नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली, तसेच शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली.

यावेळी जिल्हाधिकारी आशिष येरेकर, पश्चिम विदर्भ प्रादेशिक विभाग ज्येष्ठ नागरिक महासंघाचे अध्यक्ष डॉ. पुरुषोत्तम गावंडे, ज्येष्ठ नागरिक महासंघाचे अध्यक्ष डॉ. दामोदर पवार, संत गाडगेबाबा ज्येष्ठ नागरिक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष वासुदेव उमाळे, संत गाडगेबाबा अध्यासनचे अध्यक्ष डॉ. दिलीप काळे, प्रादेशिक उपायुक्त समाज कल्याण विभागाचे वित्त व लेखा सहायक संचालक डॉ. दिनेश मेटकर, समाज कल्याण सहाय्यक आयुक्त राजेंद्र जाधवर, समाज कल्याण विभाग विशेष अधिकारी सचिन मोरे उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी ज्येष्ठ नागरिक मंडळ पूरग्रस्तांच्या मदतीसाठी 21 लाख रूपयांचा निधी गोळा करणार आहे. तसेच विविध सामाजिक कार्यात अग्रेसर असल्याबद्दल समाधान व्यक्त केले. सध्याच्या परिस्थितीकडे ज्येष्ठ नागरिक संवेदनशिलपणे पाहत आहेत, ही आपल्या संस्कृतीचा भाग असल्याचे सांगितले. ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाने पुढील पिढीचे भवितव्य घडत असते. त्यामुळे ज्येष्ठ हा दिवस कृतज्ञता व्यक्त करण्याचा आहे. यानिमित्ताने ज्येष्ठांच्या संपत्तीचे संरक्षण करणे, त्यांच्या आरोग्याच्या समस्या निकाली काढणे, वृद्धपकाळातील पेन्शनची प्रकरणे निकाली काढण्यात येतील. तसेच आयुष्मान भारत कार्ड आणि महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ घेण्याचे त्यांनी आवाहन केले.

श्री. जाधवर यांनी प्रास्ताविक केले. समन्वयक श्रीकृष्ण पखाले यांनी सूत्रसंचालन केले. जनसंपर्क अधिकारी मंगला देशमुख यांनी आभार मानले.


Post a Comment

0 Comments