अमरावती, दि. 24 (ग्रामीण उदय प्रतिनिधी) : कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष ॲड. निलेश हेलोंडे पाटील हे शुक्रवार, दि. 26 सप्टेंबर रोजी जिल्ह्याचा दौरा करणार आहेत.
दौऱ्यानुसार, शुक्रवार, दि. 26 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता वरुड येथील वडसावित्री ऑरगॅनिक फार्मर्स प्रोड्युसर कंपनी लिमीटेड यांच्या जैविक निविष्ठा संसाधन केंद्राच्या उद्घाटन कार्यक्रमास उपस्थित राहतील. दुपारी 3 वाजता विभागीय आयुक्त कार्यालयातील मिशनच्या कार्यालयात उपस्थित राहतील. त्यानंतर सोईनुसार काटोलकडे प्रयाण करतील.
0000
Post a Comment
0 Comments