‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेतील महिलांसाठी सूचना आधार इ-केवायसी दोन महिन्यांत पूर्ण करा - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Thursday, September 25, 2025

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेतील महिलांसाठी सूचना आधार इ-केवायसी दोन महिन्यांत पूर्ण करा


अमरावती, दि. 26 (ग्रामीण उदय प्रतिनिधी):
'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' या महत्त्वाकांक्षी योजनेतील पात्र लाभार्थी महिलांच्या पडताळणी आणि प्रमाणीकरणासाठी इ-केवायसी (इलेक्ट्रॉनिक नो युवर कस्टमर) माध्यमाद्वारे आधार प्रमाणीकरण (Aadhaar Authentication) करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. या संदर्भातील इ-केवायसीची सुविधा योजनेच्या अधिकृत वेब पोर्टलवर https://ladakibahin.maharashtra.gov.in उपलब्ध करून देण्यात आली आहे.

या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण चालु आर्थिक वश्‍ या परिपत्रकाच्या दिनांकापासून दोन महिन्यांच्या आत पूर्ण करणे बंधनकारक आहे. निश्चित केलेल्या कालावधीत ज्या लाभार्थ्यांनी आधार प्रमाणीकरण (Aadhaar Authentication) पूर्ण केले नाही, ते पुढील कार्यवाहीसाठी अपात्र ठरतील, याची नोंद घ्यावी. याव्यतिरिक्त, या योजनेतील लाभार्थ्यांना दरवर्षी जून महिन्यापासून दोन महिन्यांच्या कालावधीत इ-केवायसी करणे बंधनकारक राहील. लाभार्थ्यांना प्रत्यक्षात इ-केवायसी बाबत कोणती कार्यवाही करावी लागेल, याची माहिती 'परिशिष्ट-अ' (Flowchart) मध्ये देण्यात आली आहे. प्रशासनाने सर्व पात्र महिलांना त्वरित योजनेच्या वेब पोर्टलला भेट देऊन आपले इ-केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे.


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages