‘स्वच्छता ही सेवा 2025': अमरावती डाक विभागाचा अभिनव उपक्रम - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Thursday, September 25, 2025

‘स्वच्छता ही सेवा 2025': अमरावती डाक विभागाचा अभिनव उपक्रम



अमरावती, दि. 26 (ग्रामीण उदय प्रतिनिधी ): भारतीय डाक विभागाने आरोग्य आणि पर्यावरणातील शुद्धता टिकवण्यासाठी  17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2025 या कालावधीत 'स्वच्छता ही सेवा 2025' हे विशेष अभियान अमरावतीमध्ये राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत विविध मोहिमांचे आयोजन करण्यात आले.

स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यासाठी स्वच्छता रॅली आणि मोहिम आयोजित करण्यात आली. या मोहिमेमध्ये नागरिकांना सिंगल युज प्लास्टिकचा वापर पूर्णपणे टाळण्याचे आणि परिसर स्वच्छ राखण्याचे आवाहन करण्यात आले.

या अभियानाचा एक भाग म्हणून, पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी 'एक पेड माँ के नाम' या विशेष वृक्षारोपण कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले होते. 'झाडे लावा-झाडे जगवा' या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आला.

प्रवर डाक अधीक्षक अनन्या प्रिया आणि प्रवर डाकपाल सुजितकुमार लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली उपक्रम विविध उपक्रम सुरु आहेत. अमरावती प्रधान डाकघरातील सर्व कर्मचाऱ्यांनी या उपक्रमांमध्ये उत्साहाने सहभाग घेऊन समाजात स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धनाचा महत्त्वपूर्ण संदेश दिला.



Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages