Type Here to Get Search Results !

Gramin Uday Logo

Gramin Uday Logo

दुचाकीसाठी नवीन वाहन मालिका सुरू


अमरावती, दि. 11 (ग्रामीण उदय प्रतिनिधी) : परिवहनेत्तर दुचाकी संवर्गातील वाहनांसाठी नवीन वाहन मालिका सुरू करण्यात येणार आहे. यासाठी इच्छुकांनी मंगळवार, दि. 16 सप्टेंबर रोजी दुपारी 2.30 वाजेपर्यंत पसंती क्रमांकाच्या डिमांड ड्राफ्टसह अर्ज परिवहन कार्यालयात जमा करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

पसंती क्रमांकासाठी वाहन नावावर असलेल्या व्यक्तीच्या अर्जासोबत त्यांच्या पत्त्याचा पुरावा, पॅन कार्ड जोडावे. तसेच अर्जामध्ये वाहन ज्या व्यक्तीच्या नावे आहे, त्या व्यक्तीचा आधारकार्डला संलग्न असलेला भ्रमणध्वनी क्रमांक नमूद करणे आवश्यक आहे. पसंती क्रमांक डिमांड ड्राफ्ट अमरावती, कॅम्‍प शाखा, ट्रेझरी ब्रांच कोड नं. 003866 येथे देय असावा.

पसंती क्रमांकाची यादी दि. 16 सप्टेंबर रोजी 4 वाजता कार्यालयातील नोटीस बोर्डवर प्रदर्शित करण्यात येणार आहे. एकापेक्षा अधिक अर्ज आलेल्या अर्जदारांनी दि. 17 सप्टेंबर रोजी दुपारी 1.30 वाजेपर्यंत पसंती क्रमांक शुल्काचा डिमांड ड्राफ्ट बंद लिफाफ्यात जमा करावेत. दुपारी 3 वाजता प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्या दालनात डिमांड ड्राफ्ट अर्जदारासमोर उघडण्यात येतील, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी कळविले आहे.

00000

--

Post a Comment

0 Comments