तिवसा दिनांक ११ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क)
राष्ट्रसंतांची सामुदायिक प्रार्थना म्हणजे सामाजिक संघटन राष्ट्रीय एकात्मता व राष्ट्रीय उन्नतीचा पाया आहे .असे प्रतिपादन प्रा. एड.नरेंद्र राऊत यांनी केले. पुढे बोलताना राष्ट्रसंतांनी ग्राम विकासाचे व शेतीचे महत्व सांगून गो वंशावर आधारित नैसर्गिक शेती प्रणाली ग्राम गीतेच्या १५ व्या गो वंश सुधार या अध्यायात विस्तृत पणे नमूद केले आहे.तसेच ग्राम निर्माण पंचकात ग्राम विकासा च्या विविध योजना सांगितल्या आहेत.त्याच योजना आता केंद्र सरकार राबवित आहे.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० व जीवन शिक्षण अध्याय १९ मध्ये कमालीचे साम्य असून राष्ट्रसंतांनी १९५४ मध्ये लिहिलेल्या ग्राम गीतेमध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० मधील अनेक मुद्दे अगोदरच विशद केले असून ते आजही तंतोतंत लागू होत आहे.
त्यामध्ये प्रामुख्याने मातृ भाषेतून शिक्षण,व्यावसायिक व तांत्रिक शिक्षण,जीवन उपयोगी शिक्षण,शेती विषयक शिक्षण,शिशु संगोपन केंद्र,बालवाडी शिक्षण, पोट भरता येईल असे शिक्षण ,शिक्षण क्षेत्रात संशोधन,साक्षरता प्रचार आदी बाबींचा समावेश असल्याचे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमाला सुरज महाराज पोहेकर,माजी महापौर एड.किशोर शेळके, नितीन यादव,श्रीमती महाले,सौ.प्रभा कडू,सौ. वडे, वैकुंठ कुकडे,जनार्दन इंगळे,तसेच आश्रम शाळे चे विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्र संचालन श्री. व्यंकटेश उंदरे यांनी केले.
यावेळी प्रा.राऊत यांचा संस्थान चे वतीने सत्कार करण्यात आला आहे
Post a Comment
0 Comments