परतवाडा दिनांक ११ ( ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क)
भारतीय जनता पार्टी मेळघाट जिल्हा अमरावती कार्यशाळा व जिल्हा कार्यकारणी विस्तारित बैठक ११ सप्टेंबरला परतवाडा येथील मयूरी हॉटेलमध्ये जिल्हाध्यक्ष प्रभुदास भिलावेकर माजी आमदार यांचे अध्यक्षते खाली संपन्न झाली आहे.
या बैठकीला श्री. केवलराम काळे आमदार, श्री जयंत डेहनकर प्रदेश सचिव, तथा सुधीर रसे, नयना जोशी, गोपाल चंदन, सदाशिव खडके हे महामंत्री उपस्थित होते.
या बैठकीमध्ये मेळघाट जिल्हा महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष सौ प्रियंका मालठाणे यांनी सौ. नीलिमा निमकर,भाग्यश्री राजपूत, सौ दुर्गा सोनपरोते, सौ, दुर्गा बीसदरे,यांची जिल्हा सरचिटणीस (महामंत्री) पदी निवड केली आहे. या सर्वांचे जिल्हाध्यक्ष श्री प्रभुदास भिलावेकर आमदार केवलराम काळे , व जयंत डेहनकर यांनी अभिनंदन स्वागत केले आहे.
या बैठकीला डॉक्टर कविटकर, सौ.अक्षरा लहाने, मनोहर सुने, अभय माथने, गोपाल तीरमारे, माधव अवघड, नरेश बर्वे,श्याम गंगराळे नारायण बोरेकर उपस्थित होते. बैठकीचे प्रस्ताविक डॉक्टर कविटकर यांनी तर संचालन शाम गंगराळे यांनी केले आहे.
Post a Comment
0 Comments