Type Here to Get Search Results !

Gramin Uday Logo

Gramin Uday Logo

बालमुकूंद राठी विद्यालयातील संघांचा जिल्हास्तरीय हॉलीबॉल स्पर्धेत विजय





विजयानंतर विभागीय स्तरावर निवड 

शिरजगाव कसबा दिनांक १३ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क)

       येथील श्री बालमुकुंद राठी विद्यालय, विद्यालयाचे  १४ वर्ष वयोगटातील मुलीच्या संघाने जिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत अंतिम फेरीत वरुड तालुक्याचा पराभव करून  विजेतेपदाचा मान पटकाविला आहे. तसेच १९ वर्ष वयोगटातील मुलींनी अंतिम सामन्यात वरुड तालुक्यात जागृत विद्यालयाच्या मुलींचा पराभव करून विजेतेपदाचा मान पटकाविला आहे.

अमरावती येथील अंबापेठ मैदानावर ही स्पर्धा पार पडली आहे. या विजयामुळे दोन्ही संघ आता विभागीय स्पर्धेसाठी पात्र ठरले आहे.

या यशामुळे श्री बालमुकुंद राठी विद्यालयाचे नाव तालुक्यात उंचावले गेले आहे. सर्व क्रीडा विद्यार्थी यांना नवीन दंडाळे क्रीडा मार्गदर्शन लाभले आहे. या यशाबद्दल विद्यालयाचे अध्यक्ष विजय राठी, उपाध्यक्ष श्यामसुंदर राठी, सचिव प्रशांत राठी, मुख्याध्यापक सतीश सुरडकर,‌ पर्यवेक्षक नवलकर यांचे विद्यार्थी पालकांनी आभार मानले आहे.


Post a Comment

0 Comments