अमरावती, दि. 17 : कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष ॲड. निलेश हेलोंडे पाटील यांनी काल दि. 16 सप्टेंबर रोजी शिवणी रसुलापूर, ता. नांदगाव खंडेश्वर येथे आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंब सुफला योगेश नेरकर यांच्या घरी भेट दिली.
यावेळी त्यांनी कौटुंबिक माहिती घेऊन शासकीय योजनेचा लाभ घेतला असल्याबाबत माहिती घेतली. नेरकर कुटुंबाला उर्वरित योजनाचा लाभ देण्याबाबत विभाग प्रमुखांना सूचना दिल्या. तसेच शिवनी, रसूलापूर येथील सोयाबीन पिकाची पाहणी करून शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या.
भेटी दरम्यान तहसीलदार अश्विनी जाधव, गट विकास अधिकारी डॉ. श्रीमती. स्नेहल शेलार, तालुका कृषी अधिकारी विकास पाटील, महिला व बालविकास अधिकारी श्री. गलफड, ग्राम महसूल अधिकारी अश्विनी उईके, वैभव लाड, कृषी सहायक पुरुषोत्तम वंजारी, सरपंच शशिकला खडसे, चंद्रशेखर गावंडे, गजानन देशमुख, पोलीस पाटील प्रवीण इरतकर, चंद्रशेखर गावंडे उपस्थित होते.
Post a Comment
0 Comments