शिरसगाव कसबा परिसरात तुफान वादळी पाऊस संत्रा फळ पिकासहित सर्व पिके धोक्यात - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Sunday, September 21, 2025

शिरसगाव कसबा परिसरात तुफान वादळी पाऊस संत्रा फळ पिकासहित सर्व पिके धोक्यात

 



           

 दिनांक २२ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क)

   शनिवार आठवडी बाजाराचे दिवसाला दुपारी १२ व  ४ वाजता तुफान वादळी वीज कळकडासह पाऊस झाल्याने संत्रा फळपिकासह कापूस ,तूर, सोयाबीन ही पिके धोक्यात आलेली आहे.

शनिवार बाजार या परिसरातील शिरसगाव कसबा ,पांढरी, रतनपुर सायखेडा, सर्फापूर पाळा ,मांगिया या गावासाठी आठवडी बाजार असतो या गावातील नागरिक आठवड्यासाठी या बाजारातून धान्य, भाजीपाला व इतर खरेदी करीत असतात परंतु दोन वेळा पाऊस आल्याने व्यापाऱ्यांचे पूर्णतः नुकसान झाले आहे. पूर्ण बाजारामध्ये व गावातील चौका चौकामध्ये पाणी साचलेले असून तलावाचे स्वरूप दिसत होते.

या भागात सतत ३ दिवसापासून पाऊस सुरू असून सर्व शेतामध्ये पाणी साचलेले आहे. संत्रा बगीच्या मध्ये  ६० टक्के फळाची गळण झालेली आहे. सतत पावसाने कपाशी वाढलेली आहे. त्याला त्या प्रमाणात बोंडे लागलेले नसून ती आता पिवळी पडत आहे. अति पावसाने शेतकऱ्यावर डोळे पांढरे करण्याची वेळ आली असल्याने  शासनाने ओला दुष्काळ जाहीर करून तात्काळ शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी केली जातआहे.


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages