अमरावती, दि. ३ (ग्रामीण उदय प्रतिनिधी) : कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष ॲड. निलेश हेलोंडे पाटील हे आज बुधवार, दि. ३ सप्टेंबर रोजी जिल्ह्याचा दौरा करणार आहेत.
दौऱ्यानुसार, बुधवार, दि. ३ सप्टेंबर रोजी ३ वाजता विश्रामगृह, तिवसा येथे तालुक्यातील शेतकरी आत्महत्या व शासकीय जमिनीवर चारा लागवड यासंबंधी चर्चा करतील. दुपारी ३.३० वाजता आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियास भेट देतील. त्यानंतर सायंकाळी ५.३० वाजता सोईनुसार काटोलकडे प्रयाण करतील.
Post a Comment
0 Comments