Type Here to Get Search Results !

Gramin Uday Logo

Gramin Uday Logo

जिल्हा प्रशासनातर्फे सोमवारी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिर



अमरावती, दि. ०३ : अमरावती जिल्हा प्रशासनातर्फे एमपीएससी आणि यूपीएससी स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सदर शिबिर सोमवार, दि. ८ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता होणार आहे.

शिबिरामध्ये प्रमुख मार्गदर्शक म्हणून आयएएस अधिकारी श्रीमती कौशल्या एस. आणि उपजिल्हाधिकारी सोनल सूर्यवंशी उपस्थित राहणार आहेत. दोन्हीही अधिकारी त्यांच्या स्पर्धा परीक्षेच्या अनुभवावर आधारीत मार्गदर्शन करणार आहेत.

सदर शिबिर जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन भवनात होणार असून, प्रवेश निःशुल्क आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

Post a Comment

0 Comments