Type Here to Get Search Results !

Gramin Uday Logo

Gramin Uday Logo

शेती स्वालंबन मिशनच्या अध्यक्षांची पोहरापुर्णा येथे सांत्वनपर भेट



अमरावती, दि. 13 (ग्रामीण उदय प्रतिनिधी ) : कै. वसंतराव नाईक शेती स्वालंबन मिशनचे अध्यक्ष अॅड. निलेश हेलोंडे पाटील यांनी पोहरापुर्णा येथे आत्महत्या केलेल्या कुटुंबियांना भेट दिली.

ॲड. हेलोंडे पाटील यांनी गुरूवार, दि. 11 सप्टेंबर रोजी पोहरापुर्णा, ता. भातकुली येथील नितीन बोबडे या आत्महत्या केलेल्या शेतकरी कुटुंबास सांत्वनपर भेट दिली. यावेळी स्वीय सहाय्यक मनोज कापडे, भातकुलीचे तहसीलदार डॉ. अजितकुमार येळे आदी उपस्थित होते.

अॅड. हेलोंडे पाटील यांनी आत्महत्याग्रस्त कुटुंबीयांची आत्मियतेने चौकशी केली. मृतक नितीन बोबडे यांचा मुलगा सार्थक बोबडे आणि मुलगी धनश्री बोबडे यांच्या शिक्षणाबाबत विचारपूस केली. तसेच मृतकाची पत्नी रुपाली बोबडे यांना घरगुती व्यवसायाचे प्रशिक्षण, तसेच शासकीय योजनांचा लाभ देण्याबाबत सांगितले.


Post a Comment

0 Comments